सर्वरोग निदान व उपचार शिबिरला प्रचंड प्रतिसाद....250 रुग्णांनी केला उपचार व औषधोपचार....


वरोरा.. जगदीश पेंदाम

 तालुक्यातील शेगाव बु. येथे दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था द्वारा संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानी सर्वरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले यात 250 हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला यात तरुण प्रौढ  तरुण तरुणी यांनी आपले उपचार केले. यात रक्तदाब बरेच दिवसाचे ताप किडनीचे आजार हृदयरोग वारंवार चक्कर येणे डोळ्यांचे आजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया यावर उपचार तसेच संधिवात मणक्याचे आजार वाकलेली पाय फ्रॅक्चर हाडांचे सर्व आजार यावर उपचार करून औषधोपचार करण्यात आले. यासोबत स्त्रियांविषयी असणारे आजार मासिक पाळीचे आजार व  महिलांचे आजार अशा अनेक आजारावर उपचार करण्यात आले. यावेळी अनेक रुग्णांना त्यांच्या उपचाराकरिता विशेष मार्गदर्शन करून औषधोपचार त्यासोबत त्यांना लागणारे साहित्य मोफत देण्यात आले  यासोबत वृद्ध रुग्णांना मोफत गुडघ्याची टोपी .चालण्याची काठी .व डोळ्याचे नंबरचे चष्मे मोफत देण्यात आले या शिबिराचे उद्घाटन येथील सरपंच सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून  मुरलीधर उमाटे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता , राशेदा  शेख. सामाजिक संरक्षण अधिकारी हेल्पेज इंडिया वरोरा .अक्षय बोंदगुलवार ,मान्यवर उपस्थित होते. तर या शिबिराकरिता येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अंकित जयस्वाल , डॉ. अपूर्वा धाबे स्त्रीरोग तज्ञ , डॉ.शुभांगी नागपुरे नेत्ररोग, डॉ. महर्षी पटेल जनरल फिजिशियन  इत्यादी अधिकारी हजर होते. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी अमोल दातारकर ,  आकाश नाकाडे, संदीप चौधरी , सूरज देवगडे , विनोद उमरे , आकाश झाडे , इत्यादी सह गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]