मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर प्रशासनाचा भर

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर  प्रशासनाचा भर

- उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम 

Ø बल्हारपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ९७८ मतदार

Ø 85 वर्षावरील व दिव्यांग मतदारांना घरून मतदानाची सोय

Ø नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक कार्यान्वित


मूल दि. 17 : केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 13 - चंद्रपूर लोकसभा  मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यासाठी  बल्हारपूर विधानसभा निवडणुक विभाग पूर्णपणे सज्ज असून आगामी निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर  प्रशासनाचा भर आहे, असे प्रतिपादन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय  विशालकुमार मेश्राम  यांनी केले.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मूलचे  तहसीलदार मृदुला मोरे, पोंभूर्णाचे तहसीलदार शिवाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार यशवंत पवार, प्रकल्प अधिकारी तथा निवडणूक आचारसंहिता नोडल अधिकारी निलेश चव्हाण  आदी उपस्थित होते.

 मतदार जनजागृतीकरीता स्वीप योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे,    

बल्हारपूर विधानसभा मतदार संघात एकूण ३ लक्ष ९७८ मतदार :  यात १ लक्ष ५३ हजार ९५६ पुरुष मतदार, १ लक्ष ४६ हजार १९० स्त्री मतदार आणि इतर ३  जणांचा समावेश आहे.    विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५७ आहेत.

85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले २२४६  मतदार  आहेत. तसेच   मतदार संघात एकूण १८४२ दिव्यांग मतदार आहेत.  

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40  टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारास गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारास 12 डी नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.


नियंत्रण कक्ष व विविध संपर्क क्रमांक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक– 2024 करीता चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07172- 271617 आहे. सोशल मिडीया नियंत्रण व तक्रारीकरीता पोलिस विभागातर्फे 8888511911 हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून 24 बाय 7 कार्यरत राहणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे तक्रार निवारण / मदत कक्ष, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तक्रार निवारण / मदत कक्षाचा टोल फ्री क्रमांक 1950 असून आदर्श आचार संहिता कक्षाचा क्रमांक 8788510061 आहे. तसेच सी-व्हिजील / ई.एस.एम.एस. या ॲप वरही तक्रार नोंदविता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]