महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने नांदेड रेती घाटावर खुलेआम रेतीची वाहतूक सुरू

नागपुरातील राजकिय राजाश्रय रेती घाटावर

पोलीस प्रशासनाचेही डोळे बंद

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी तहसील हद्दीपासून काही अंतरावर लाखांदूर तालुक्यातील हद्दीत येत असलेल्या नांदेळ रेती घाटावर रेती तस्कारांनी मोठ्या प्रमाणात रेतीची लुट मांडली असुन नांदेड रेती घाटावर दररोज भर दिवसा व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर हायवा द्वारे रेतीची बिंधास्त्त वाहतूक सुरु असल्याने शासनाच्या दररोज करोडो रुपयाच्या महसुलाची लूट केली जात आहे.गेल्या अनेक दिवसापासून लाखांदुर तालुक्यातील नांदेड या रेती घाटावर रेती चोरीचा खेळ खेळल्या जात असून याबाबत ची पुरेपूर माहिती महसूल प्रशासनास असल्याने सुध्दा कारवाई करण्यात येत नाही का ? या रेती घाटाच्या लिलावाची मूदत संपुनदे‌खील याच घाट मालकाने घाटावरचा कब्जा सोडला नसल्याने या घाटावरील रेतीचा उपसा हाच करीत असल्याची एकच चर्चा गावात होत असल्याचीही माहीती पुढे येत आहे. रेती उपसा करण्याची परवानगी अखेर दिली तरी कुणी? असा प्रश्न जनतेला पडला आहे.या रेती घाटातुन होणारा अतोनात रेतीचा उपसा हा पटवारीला का दिसत नाही ? तहसीलदारांना सुद्धा का दिसत नाही ? पोलीस विभागाला सुद्धा का दिसत नाही ? कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल अशाप्रकारे चोरीला जातो ?महसुलच्या सर्व विभागाने जाणीवपूर्वक आर्थिक देवाण - घेवाण करून तर  पाठ फिरविली नसेल असाही ? निर्माण झाला आहे.जिल्हाधिकारी यांनी आदर्श आचार संहिता जाहीर केली असतांना सुद्धा आदर्श आचार संहिता सुरू झाली असल्याचे चित्रही यावरून दिसून येत नाही आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]