नगरपालिकेतील सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे सदनिका मिळण्यात यावे - अक्षय वाल्मीक.राज्यातील महानगरपालिकेतील नगरपालिकेतील सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कामगारांची सेवा 25 वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सफाई कामगारांच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास अशा सफाई कामगारांच्या निधनानंतर त्यांच्या पात्र वारसास महानगरपालिका नगरपालिका कडून मालकी हक्काने मोफत सदनिका देणे बाबत शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत सदनिका वाटप करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना चे अंतर्गत शासनास उपलब्ध होणारे पुनर्वसन घटका व्यतिरिक्त अधिकचे रहिवासी गाळे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम व बेसिक सर्विसेस फॉर अर्बन पुअर या योजनेअंतर्गत बांधण्यात येणारे रहवासी गाळी आणि म्हाडा अल्प उत्पन्न गटाची गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदनिकांचे 15 टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. असे सूचना स्पष्ट असतांना ही.
सफाई कामगार व त्यांचे पात्र वारसदार आपल्या हक्काच्या सदानिकांपासुन वंचित राहतात.
ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटनेचे प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक यांनी,दि.२३/०२/२०२४ रोजी, नागपुर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र जी फडणीस यांची भेट घेऊन त्यांना याप्रकाराबद्दल निवेदन देऊन माहीती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]