२० वर्षांपूर्वील घरकुलधारकांना लाभ द्या - मादगी समाज संघटनेची सावली

२० वर्षांपूर्वील घरकुलधारकांना  लाभ द्या - मादगी समाज संघटनेची सावली
सावली - सन २००४ पूर्वी मिळालेले घरकुल कमी किंमतीचे होते व ती घरे मोडकळीस आल्याने त्यांना घरकुलाचा लाभ द्या व रेकॉर्डला जागा नसलेल्या कुटुंबाना दुमजली बांधकामास परवानगी देण्याची मागणी सावली तालुका मादगी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
      सन २००४ पूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वी मिळालेले घरकुल १४,००० व २८,००० रूपयाच्या साधारण किंमतीचे होते. त्यावेळी स्थानिक वस्तू वापरून कवेलू, विटा मातीचे घरे बनविण्यात आली. त्यामुळे ती घरे मोडकळीस आली आहेत त्यामुळे त्यांनाही नव्याने घरकुल देण्यात यावी, तसेच ज्यांच्या नावे नमुना आठ अ नाही परंतु त्यांना घरकुलाची नित्तांत गरज आहे. अशा लाभार्थ्यांना त्यांच्या  आई वडीलांच्या घरावर दुमजली घराचे बांधकाम करण्यास परवानगी द्यावी अशा मागणीचे निवेदन सावली तालुका मादगी समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे प्रदेश महासचिव आकाश आलेवार व जिल्हा अध्यक्ष अनिल बोटकावार, जिवनदास गेडाम, सुनील नल्लुरवार, सुनील कोरेवार, विनोद गोरडवार,बाळकृष्न गोरडवार उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]