कोणता झेंडा घेवू हाती?

कोणता झेंडा घेवू हाती?


चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात परंपरागत लढत देणार्या पक्षांनी आप—आपले उमेदवार जाहीर केल्यांने आता प्रचाराची रणधुमाळी माजणार आहे. दोनही बाजुने आरोप—प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार आहे.  बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रातून यावेळी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात मात्र रंगत येणार आहे.  या क्षेत्रात कॉंग्रेसची धुरा सांभाळणार्या संतोष रावत गटाकडून निवडणूकीत कोणती भूमीका बजावली जाणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे पक्षनिष्ठा तर दुसरीकडे आपल्यावर ज्यांनी गोळीबार केला, अशांशी संबधीत असणार्याचा प्रचार! कुणाच्या बाजूने रावत गट यावेळी उभा राहील? याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
2019 च्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या वतीने बाळू धानोरकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.  यासाठी कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्वाची भूमीका बजावली होती.  यामुळे बाळू धानोरकर यांचे विजयासाठी विजय वडेट्टीवार व त्यांच्या समर्थकांनी पंजाचा जोरदार प्रचार केला.  यात बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात संतोष रावत यांनीही बाळू धानोरकर यांचे बाजूने ताकद लावल्यांने, बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात भाजपाचा गढ असतांनाही, कॉंग्रेसचे धानोरकर यांना मोठी आघाडी मिळाली होती.
बाळू धानोरकर यांनी आपल्या खासदार निधीतून, संतोष रावत यांचे नेतृत्वात मूल शहरात असलेल्या दुर्गा मंदिर परिसरात सभागृहासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. मात्र हा 'वेलेंटाईन' फार दिवस टिकला नाही.
कोरोण काळात खासदार बाळू धानोरकर आणि तेव्हाचे पालकमंत्री वडेट्टीवार यांचेत दुरावा निर्माण झाला. कोरोणाग्रस्तांना खनिज विकास निधी मधून देण्यात येणार्या 'किट' वरून किट—किट निर्माण झाली.  जिल्हयात दोन गट निर्माण झाले.  विजय वडेट्टीवार यांचे गटातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे नेतृत्वातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विरोधात खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत तर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत विविध प्रकरणे लावून धरली, या सर्व प्रकरणाची चौकशीही लावली. मध्यवर्ती बॅंकेत कर्मचारी भरती प्रकरणात दोनही गटात कायम वाद राहीला.  संतोष रावत यांनी भरतीची परवाणगी आणायची तर धानोरकर दाम्पत्यांनी आणलेली परवाणगी कोणत्या  ना कोणत्या कारणावरून रद्द करवून घ्यायचे. यात वाद वाढत गेले, वाद ऐवढे विकोपाला गेले कि, संतोष रावत यांचेवर गोळीबार करण्यात आला व गोळीबार करणारा आरोपी हा खासदार बाळू धानोरकर यांचे गोटातील असल्यांने राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.  या प्रकरणात स्वर्गीय धानोरकर यांचेवरही संशयाची सुई होती. 
2024 च्या निवडणूकीत विजय ​वडेट्टीवार विरूध्द प्रतिभा धानोरकर असा तिकीटासाठी सामना रंगला, यात प्रतिभा धानोरकरांनी उमेदवारी मिळविण्यांत यशस्वी ठरले.  यामुळे आता रावत गटासमोर पक्ष निष्ठा सांभाळीत, ज्यांनी आपल्याला जीवनातून उठविण्यांचा प्रयत्न केले त्यांचा प्रचार करायचा कि, वेगळी भुमीका घ्यायची असा धर्मसंकट निर्माण झाले आहे.  कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी दोन दिवसापूर्वीपर्यंत तरी संतोष रावत यांचेसोबत कोणताही संपर्क साधला नसल्यांचे रावत यांनी आमचे प्रतिनिधी सोबत बोलतांना सांगीतले. मूल, चंद्रपूर, पोंभूर्णा तालुक्यात पक्ष संघटनेवर संतोष रावत यांची मजबूत पकड आहे. ते स्वतःही बल्लारपूर विधानसभेतून काँग्रेसकडून आमदारकीचे दावेदार आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थेत रावत यांना मानणारेच लोकप्रतिनिधी आहेत.  अशा परिस्थितीत रावत यांची भूमिका या लोकसभा निवडणूकीत महत्वाची ठरणार आहे.  सध्या मात्र रावत गटासमोर विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती... अशी द्विधा मनस्थिती आहे.

२ टिप्पण्या:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]