ग्रामसभा चोरगाव : जल, जंगल, जमीन अधिकार सोबतच कर्तव्याची हमी.

ग्रामसभा चोरगाव  : जल, जंगल, जमीन अधिकार सोबतच  कर्तव्याची हमी. 

ग्रामसभा चोरगाव ला अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वन निवासी ( वन हक्काची मान्यता ) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ या  कायदा अंतर्गत २०२१ ला  ९९५ हे.  जंगल प्राप्त झाले आहे. त्याच बरोबर ग्रामसभेला संरक्षण, संवर्धन, पुनर्जीवन, व व्यवस्थापनाचे अधीकार वन अधिकार कायद्यातील कलम ३ (१) झ अन्वये मिळाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर, जिल्हा परिषद, चंद्रपूर जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व टाटा सामाजिक विज्ञान संस्थान,मुंबा यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ८ तालुक्यातील १०० वनहक्क प्राप्त गावे निवडण्यात आली ज्यामध्ये ज्या गावांना ५० हे.आर. पेक्षा अधिकचे वनक्षेत्र मिळाले त्या गावांचा समावेश होता. त्यापैकी एक गाव म्हणजे ग्रामसभा चोरगाव. हे गाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर  झोन मध्ये आहे. ह्या गावामध्ये संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात वेगवेगळ्या उपक्रमातून ग्रामासभेतिल सभासदांमध्ये जणजागृती कऱण्यात आली. ग्रामसभेला प्राप्त झालेल्या अधिकार समजावून सांगण्यात आले. त्याच बरोबर ग्रामसभेच्या जबाब दाऱ्या, कर्तव्य या संदर्भाने सभासदांना जाणीवा निर्माण व्हाव्यात या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला. याच प्रक्रीयेत ग्रामसभेने एक पाऊल पुढे टाकत जंगल संरक्षण व्हावे याकरीता ग्रामसभेत सभासदांनी चर्चा करून सर्व संमतीने असे ठरविले की ग्रामसभेच्या सभासादांपैकी पाच सभासद जंगलात नियमित गस्त घालतील. त्यात त्याचा उद्देश आहे की जंगलाची हानी होईल अश्या सर्व बाबीवर नियंत्रण ठेवता यावे. ज्यामध्ये चोरी, शिकार, आग, इत्यादी गोष्टी नियंत्रणात ठेवता येत आहे. ही प्रक्रिया गेल्या एक महिन्यापासून ग्रामसभा करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]