रेती डेपो सुरु करून रेतीचा पुरवठा करा - सावली तालुका सरपंच संघटनेची मागणी

रेती डेपो सुरु करून रेतीचा पुरवठा करा - सावली तालुका सरपंच संघटनेची मागणी 
चंद्रपूर -  सावली तालुक्यातील शासकीय रेती घाट  त्वरित सुरू करण्यात यावे यासाठी सावली तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन पाठविण्यात आले. 
     चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका हा वैनगंगा नदीलगत तालुका असूनही रेती नसल्याने बांधकामे ठप्प आहेत.  ग्रामपंचायत मार्फतीने तालुक्यामध्ये घरकुले मंजूर असून त्यात  प्रधानमंत्री आवास योजना , घरकुल मोदी आवास योजना , शबरी आवास योजना , रमाई आवास योजना , यशवंतराव चव्हाण आवास योजना आहेत व मार्चपर्यंत बांधकामे करायचे आहेत. शेतकऱ्यांसाठी विहिरीही मंजूर आहेत, गावातील विकास कामे मंजूर असून तेही रेती अभावी ठप्प आहेत. मात्र शासकीय रेती डेपो नसल्याने रेती मिळत नाही व अवैद्य रेती खरेदी करणे गरिबांना शक्य नाही. 
      यामुळे सावली तालुक्यातील रेती घाट सुरू करण्यात यावे यासाठी सावली तालुका सरपंच संघटनेने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले. यावेळी सावली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष  पुुरूषोत्तम चुधरी , सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे , पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार,  महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे सावली तालुका अध्यक्ष अनिल गुरनुले , कढोलीचे सरपंच किशोर कारडे , सावली तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय मजोके ,  चिखलीचे सरपंच रेखा बानबले , चारगावच्या सरपंच ज्योती बहिरवार ,  चकपीरंजी  सरपंच उषा गेडाम,  गेवरा खुर्द सरपंच उषा आभारे ,  मोखाळाच्या सरपंच प्रणिता माशाखेत्री,  निमगावच्या सरपंच गीता लाकडे , पेंढरी मक्ता सरपंच ठुमदेवी वलादे ,  व्याहाड खुर्द सरपंच सुनीता उरकुडे  , बोरमाळा सरपंच भोजराज धारणे, हिरापूरच्या सरपंच प्रीती गोहणे, अंतरगावचे सरपंच कवींद्र लाकडे ,  लोंढोली सरपंच उष्टुजी पेंदोर  , विहीरगाव सरपंच हेमंत ढोक , उपरीचे सरपंच कुमुद सातपुते , कवठीच्या सरपंच कांता बोरकुटे, चांदली बुज. चे सरपंच विठ्ठल येग्गावार ,  हरांबा चे उपसरपंच प्रवीण संतोषवार, डोनाळ्याचे उपसरपंच जितेश सोनटक्के ,  श्रीकांत बहिरवार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]