तळोधी( बा) येथे सामूहिक महिला दिनाचे आयोजन*

तळोधी( बा) येथे सामूहिक महिला दिनाचे आयोजन* 

 तळोधी बा.------महात्मा फुले माळी समाज महिला भगिनी व विद्यार्थिनी संघटना द्वारा तळोधी (बाळापुर) येथे दिनांक १० मार्च  २०२४ रोजी जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्री आई पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून  सामूहिक महिला दिनाचे, तसेच होतकरू व संकटावर मात करीतआपले कर्तव्य पार पाडणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

             सदर कार्यक्रमानिमित्त महिलांच्या भावगीत स्पर्धा, पाककला स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, तसेच महिला मार्गदर्शन कार्यक्रमआयोजित करण्यात आलेले आहे.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  मा.सौ जयाताई मनोहरजी टेंभुरकर  मॅडम,प्रमुख मार्गदर्शक मा. एड.हर्षदा बीरे (वकील उच्च न्यायालय नागपूर)मा. सौ शमा काळबांडे (सेवानिवृत्त पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास सेवा योजनाा ब्रह्मपुरी)मा. सौ वर्षा गायकवाड (योगशिक्षिका नवरगाव )प्रमुख उपस्थिती मा.डॉ. सौ शुभांगी वीरेंद्रजी पाकमोडे प्रमुख अतिथी मा. सौ विजयाताई मनोजजी वाढई, मा. सौ पुष्पलताताई काशिनाथ जी बोरकर, मा. सौ भाग्यश्री राजेशजी घिये, मा. सौ सुषमा जीवेशजी सयाम, मा .श्रीमती सविताताई सुधाकरजी कावळे, मा. सौ. भावनाताई संजयजी बडवाईक, मा. सौ. शालिनीताई विलासजी लांजेवार,मा. श्रीमती सुनिताताई विजयजी भेंडाळे, मा. सौ हेमलताताई भाष़्करजी लोनबले,मा. सौ हर्षदाताई बंडूजी मांढरे उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमास सर्व जाती, धर्माच्या महिलांनी उपस्थित राहावे तसेच महिलांनी विविध स्पर्धेमध्ये सहभागी होऊन  आपल्या कलागुणांना वाव द्यावे असे आवाहन संपूर्ण माळी समाज भगिनी व विद्यार्थी संघटना    तळोधी बाळापुर यांनी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]