खेडी शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन महिलेची मुलीसह आत्महत्या - प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचला

  खेडी शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन महिलेची मुलीसह आत्महत्या - प्रसंगावधानाने मुलाचा जीव वाचला
सावली - खेडी शेतशिवारात आपल्या 13 वर्षीय मुलीला घेऊन विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. महिलेने 11 वर्षीय मुलालाही सोबत घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाने झटका देत सुटका करून घेतल्याने त्याचा जीव वाचला.
     मुल येथील रहिवासी असलेले दर्शना दिपक पेटकर वय 35, समीक्षा दिपक पेटकर वय 14 व साहिल पेटकर वय 11 हे खेडी येथे असलेल्या आपल्या शेतात आले. जवळच अमरदीप कोनपतीवार यांची विहीर आहे. त्या विहिरीजवळ जात मुलीला व मुलाला धक्का दिला.  मुलगी विहिरीत पडली मात्र मुलाने तावडीतून सुटत खेडी गावाकडे पळ काढला व गावात जाऊन हकीकत सांगितली. गावापासून विहिरीचे अंतर फार असल्याने लोक येईपर्यंत बराच कालावधी लोटला. पोलिसांच्या मदतीने मायलेकीला काढून ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारार्थ दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजले नसून पुढील चौकशी पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनात सावली पोलीस करीत आहेत.

आत्महत्येपूर्वी फोन करून नातेवाईकांना दिली माहिती
आत्महत्येपूर्वी आपल्या नणंदेला फोन करून माझी शेवटची भेट आहे. त्यानंतर भेट होणार नाही असेही सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]