ग्रामसभा चोरगाव च्या वातीने साजरी करण्यात आली विर पुल्लेसुर बाबुराव शेडमाके जयंती...

ग्रामसभा चोरगाव च्या वातीने साजरी करण्यात आली विर पुल्लेसुर बाबुराव शेडमाके जयंती...
ग्रामसभा चोरगाव ला  २०२१ मध्ये सामूहिक वनहक्क दावा प्राप्त झाला. व त्या नंतर सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले. त्यानंतर या समितीच्या पुढाकारातून ग्रामसभेमद्ये कायद्याच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी व आपल्याला प्राप्त झालेल्या जंगलाच्या व्यवस्थापनाच्या अधिकाराची आणि ग्रामसभेच्या कर्तव्या संदर्भात लोकांनमध्ये जाणीव निर्माण करण्यात आली. करिता गावामध्ये नियमित ग्रामसभांच आयोजन केल्या जाते. त्यामध्ये गावच्या समस्यांना सोडविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजनांवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच कडीमध्ये त्यांनी गावात सर्व जाती - धर्माच्या लोकांना एकत्र आणून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले. हया कार्यक्रमाकरीता संपूर्ण गावातून लोकवर्गणी गोळा करण्यात आली.याचाच एक भाग हा की गावात वीर पल्लेसुर बाबुराव शेडमाके जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामूहिक वनहक्क  व्यवस्थापन समितीच्या पदधिकाऱ्यांनी केले.कार्यक्रमाचे सुरुवात फलकाचे अनावरण तसेच थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर गावातील लहान चिमुकल्यांन कडून स्वागत गीत तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही पार पाडण्यात आला. उपस्थित पाहुण्यांनी आपल्या वाणीतून गाव  विकासाचा पाया कसा रचावा  याकरिता अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाा करिता अविनाशभाऊ आंबेकर ( उद्घाटक), म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर कार्यक्रमाचे  अध्यश म्हणून श्री.गणपतजी मडावी, प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजयसिंग मडावी, भोला भाऊ मडावी,प्रवेश सुटे, जगदीश डोळासकर, हिमानीताई लोंढे,  टाटा सामाजीक विज्ञान संस्था, मुंबई .  तृणाली बंदरे ग्रा.पं (सरपंच ), सौ. सिंधुताई लोनबले पंस्मात्री पं.स. सदस्या,  श्री. निखिलदादा गेडाम (FES संस्था), सौ. सविता वाडगुरे माजी सरपंच,  सुलोचना कोकोर्ड माजी सरपंच, सौ. छायाताई मोहुर्ले, पोलीस पाटील- श्री. गुरुदास मेश्राम,वरवट सा. कार्यकर्ता-श्री. परमेश्वर,  श्री. पांडुरंग कोफोडे,सामाजिक कार्यकर्ते -श्री. विठल सोनबले, सा.कार्यकर्ता-ज्योती कन्नाके,ग्रा.प. सदस्य- श्री अरविंद राहत, ग्रा.प. सदस्य-श्री. अनिल कोर्थचार्ड,रोजगार सेवक तसेच सर्व ग्रामासभा सभासद उपस्थीत होते.पंचशिल  बौध्द मंडल चोरगाव,वीर बाबुराव शेडमाके सेवा समिती,महात्मा जोतीबा फुले माळी संघटना चोरगाव यांनी आयोजनात विशेष भूमिका पार पाडली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]