आज पोलीस स्टेशन तलोधी बाळापूर येथे जागतिक महिला दिन साजरा.

आज पोलीस स्टेशन तलोधी बाळापूर येथे जागतिक महिला दिन साजरा.  
(महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणेदार म्हणून, दिली पोलीस स्टेशन चालवायची संधी)
यश कायरकर:
     आज रोजी जागतिक महिला दिन निमित्त यादवराव पोशिट्टीवार महाविद्यालयाच्या 05 युवतीं नामे प्रणाली दिघोरी ,प्राजक्ता गावतुरे , जया महाडोके, राणी दुमाने व पायल निखारे सर्व रा.तळोधी अशांना पोलीस ठाणे तळोधी येथे बाोलावुन त्यांना पोलीसांबद्दल ,पोलीस दलात महिलांना असलेल्या संधीबाबत , पोलीस दलातील पदस्थ असलेल्या महिला अधिकारींंच्या योगदानाबाबत माहीती देवुन त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तु देवुन त्यांचा सत्कार केला. 


    तसेच पोस्टेतील महिला अंमलदार पो.शिपाई संगिता कुसनवार , पो.शि. वैष्नवी लेनगुरे , पो.शि. रिया मोहुर्ले , महिला होमगार्ड करिष्मा जनबंधु व महिला होमगार्ड कांचन नागोसे , महिला सफाई कामगार मायाबाई सोयाम यांचा सत्कार करुन त्यांना भेटवस्तु देऊन त्यांच्या योगदानाबाबत धन्यवाद व्यक्त केलेत. 

     तसेच महिला अंमलदार संगिता कोसनवार यांना प्रतिनिधीक स्वरूपात ठाणेदार म्हणून संधी देवुन सन्मान करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]