जागतिक वन दिन निमित्य 'स्वाब' ने केला पेर्जागड (सेव्हन सिस्टर हिल) प्लास्टिक मुक्त.'


(दोन ट्रॅक्टर प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटल, पिशव्या व दारूच्या बाटल्या उचलून गड केला स्वच्छ.)


तलोधी(बा.):
        तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील प्रसिद्ध पेर्जागड (सेव्हन सिस्टर हिल) परिसर 'स्वाब संस्थेच्या स्वच्छता मित्रांनी' आज डोंगराच्या शिखरा पासून पायथ्यापर्यंत जवळपास दोन ट्रॅक्टर भरुन प्लास्टिक कचरा उचलून परिसर प्लास्टिक मुक्त केले.
        विशेष म्हणजे हे डोंगर तळोधी वनविभागाच्या अत्यंत घनदाट जंगल व वन्य प्राण्यांचे वावर आहे. तरीही एक समिती पर्यटकांकडून पार्किंगच्या नावाने वर्षाला लाखो रुपये वसूल करते. मात्र या समितीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन या ठिकाणी नसतो.मोठ्या संख्येत मधमाशांचे पोळे असल्यामुळे सतत मधमाशांचे हल्ल्यात पर्यटकांचे जीव सुध्दा जातात. तरीही धोकादायक गॅसचा हंडा  डोंगरावर नेऊन मॅगी व नाश्ता बनवू दिला जातो. डोंगरावर पाणी, शितपेय बाटल्या, खर्रा,शिगारेट, विकल्यामुळे पर्यटक तिथेच नशा पानी व मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा करतात याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा डोळे झाक केलेली दिसून येते.*
    मात्र पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी झटनारी 'स्वाब' संस्था गेल्या कित्येक वर्षापासून  परिसरात  'प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान' राबवून प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन श्रमदानातून प्लास्टिक पत्रावळी, बाटल्या, दारूच्या बाटल्या, पिशव्या, असा वन्यजीव व पर्यावरणास हानिकारक प्लास्टिकचा कचरा, गोळा करून त्याच्या योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त  करीत असते.
     दर वर्षी प्रसिद्ध पेर्जागड (सेव्हन सिस्टर हिल) येथे दोन दिवसाची यात्रा ही महाशिवरात्री ला असतोच व हजारो च्या संख्येने भाविक या यात्रेला येतात, या यात्रेमध्ये जाऊन संस्थेच्या वतीने हातात फलक घेऊन दोन दिवस जत्रेमध्ये फिरून 'प्लास्टिक कचरा पर्यावरणात कुठे फेकू नये, प्लास्टिक हटाओ पर्यावरण बचाओ, अशी  जनजागृती केली. व यात्रा संपल्यानंतर परिसरात सर्वत्र विखरलेला प्लास्टिकया परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिक मुक्त केले.
     यावेळी या प्लास्टिक मुक्त कार्यात संस्थेचे तळोधी, सावरगाव, खडकी, किटाळी,कन्हाळगाव, मांगरुड, मिनघरी, नागभीड, येथील स्वाब संस्थेचे महिला व पुरुष स्वच्छता मित्र, उत्तमजी मुंगमोडे, यश कायरकर, नितीन भेंडाळे, छत्रपती रामटेके, जिवेश सयाम, विनोद लेनगूरे, आमीर करकाडे,अमन करकाळे, महेश बोरकर , प्रशांत सहारे , सुरज गेडाम, निखिल शेंडे, अविनाश लोनबले,  गिरीधर निकुरे, तथा संस्थेच्या महीला स्वच्छता मित्र सौ.अर्चना आंबोरकर, सौ. मंजुषा घुगूस्कर, पायल कायरकर, अंजली गुरनूले, यांनी श्रमदानातून ही स्वच्छता मोहीम राबवली तर यावेळी वन विभागाचे गोविंदपूरचे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड, गोविंदपूर चे वनरक्षक पी.एम. श्रिरामे, येनूलीच्या वनरक्षक सौ. ए.डी. कर्हाडे , तथा वनमजूर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]