मूलमध्ये लुटमारीचा प्रयत्न

मूल : 


रेल्वे स्थानकावरून घरी जात असलेल्या एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न झाला. ही घटना रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री दहा वाजतादरम्यान घडली. येथील देवेंद्र राऊत हे ग्रेटा पॉवर कंपनीत कार्यरत आहे. ते बुधवारी वडसा येथून मूल येथे रेल्वेने आले. तेथून पायदळ घराकडे निघाले. त्यांचा दोघे व्यक्ती पाठलाग करीत होते. काही अंतरावर दोघांनी देवेंद्र यांच्या खिशातील मोबईल हिसकावून पळ काढला. देवेंद्र राऊत यांनी आरडाओरड करीत त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर चोरट्यांनी मोबाईल फेकून पळ काढला. त्यानंतर राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. गेल्या काही दिवसांपासून मूल परिसरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पोलिसांनी गस्त वाढविणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]