माळी समाज तळोधी( बा) द्वारा सामूहिक महिला दिन साजरा

माळी समाज तळोधी( बा) द्वारा सामूहिक महिला दिन साजरा 

       तळोधी ( बा) : महात्मा फुले माळी समाज महिला भगिनी व विद्यार्थिनी संघटना तळोधी (बा.) द्वारा  दिनांक १० मार्च  २०२४ रोजी सामूहिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीआई पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून  सामूहिक महिला दिन तसेच होतकरू व संकटावर मात करीतआपले कर्तव्य पार पाडणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

             सदर कार्यक्रमानिमित्त महिलांच्या भावगीत स्पर्धा, पाककला स्पर्धा, एकल नृत्य स्पर्धा, तसेच महिला मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून  मा.सौ विजयाताई वाढई यांनी महिलांना व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक मा. एड.हर्षदा बीरे यांनी कौटुंबिक हिंसाचार महिलांसाठी कायदे व कायदेविषयक सल्ला या विषयावर महिलांना संबोधित केले. सौ.शमा काळबांडे  यांनी महिलांचे आरोग्य, आहार आणि बालसंगोपन या विषयावर मार्गदर्शन केले.मा. सौ वर्षा गायकवाड यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व प्रत्यक्ष योगा करून महिलांना पटवून दिले. मा.डॉ. सौ शुभांगी पाकमोडे यांनी महिलांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यावर निराकरण कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
     तसेच या सामूहिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त तळोधी च्या प्रथम नागरिक   मा. सौ.कल्पनाताई मस्के ,मा. सौ पुष्पलताताई  बोरकर, मा. सौ भाग्यश्री  घिये, मा. सौ सुषमा सयाम, मा .श्रीमती सविताताई  कावळे, मा. सौ. भावनाताई  बडवाईक, मा. सौ. शालिनीताई  लांजेवार,मा. श्रीमती सुनिताताई  भेंडाळे, मा. सौ हेमलताताई लोनबले,मा. सौ हर्षदाताई  मांढरे उपस्थित  होते. 
         सामूहिक महिला दिनाचे औचित्य साधून माळी समाजाच्या वतीने होतकरू व संकटावर मात करीत आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या श्रीमती पार्वताबाई देशमुख, सौ अर्चनाताई वाढई, श्रीमती पौर्णिमाताई बारसागडे , श्रीमती संगीताताई नगरे, श्रीमती हंसाताई लोनबले यांचे,*सक्षम नारी पुरस्कार'* देऊन गौरव करण्यात आला.    तसेच श्रीमती वैशालीताई लांजेवार यांना सामाजिक कार्यासाठी   समाजाच्या वतीने  *'झेप'* पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.   

         कार्यक्रमात घेतलेल्या विविध स्पर्धेमध्ये सर्व जाती  धर्माच्या महिलांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीताताई चुटे व सौ.संजीवनीताई वाढई यांनी केले व उपस्थितांचे आभार माळी महिला भगिनींनी नृत्य सादर करून मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  संपूर्ण माळी समाज भगिनी व विद्यार्थी संघटना तळोधी ( बा. ) यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]