सामान्य माणसाच्या जिवनाशी खेळ खेळणा-या बोगस डुप्लीकेट निकृष्ट दर्जाच्या सुगंधीत तंबाखु व गुटखा तस्करी प्रकरणाची चौकशी करून माफियास तात्काळ अटक करावी चिमूर तालुका कांग्रेसची मागणी

चिमुर तालुक्यात अनेक प्रकारचे अवैधरित्या बेकायदेशीर रेती, सट्टा, बोगस तंबाखु व गुटखा यांचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू या सर्व व्यवसायास राजकीय सरंक्षण दिल्या जाते तरी कसे

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि.१५/०३/२०२४ ला तालुका सावनेर जि.नागपुर  या पोलीस स्टेशन हददीतील हेटी पोलीस चौकी च्या ठिकाणी गस्त सुरू असतांना भाजपचा झेंडा लावुन असलेली MH 34 BR 1331 या पांढ-या रंगाच्या अर्टिका गाडीची तपासणी केली असता ३ लाख १ हजार रूपयाचा तंबाखु व गुटखा तसेच ८ लाख रूपयांची कार असा अंदाजे १२ लाख रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. व कलम २७२,२७३,१८८ व ३२८ व अन्न सुरक्षा कायदा २००६ या कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये चिमुर शहरातील नामांकित भाजपचे आमदार भांगडीया यांचे कार्यकर्ते व नंदीनी ट्रॅव्हल्स चे मालक नरेंद्र हजारे, पंकज गोठे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका महामंत्री व खडसंगी जि.प. सर्कल प्रमुख रोशन बन्सोड यांना सुगंधीत तंबाखु व गुटखा या मुद्देमालासह अटक करण्यात आली. परंतु यातील रोशन बन्सोड हे फरार आहे. हे सर्व आरोपी चिमुर व खडसंगी परिसरातील रहिवासी आहे.सामान्य जनतेच्या जिवाशी हा खेळ अनेक वर्षा पासुन सुरू आहे. तसेच रेती तस्करी, सट्टा पटटी, दारूबंदीच्या काळापासुन अवैध दारू विक्री असे अनेक अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. यामधुन मिळणारी अवैध रक्कम ही राजकारणात वापरली जात आहे. सन २०२४ च्या घोषित झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व नकली सुगंधीत तंबाखु व गुटखा याचा वापर करून जनतेला प्रलोबन देऊन भाजपला मतदान करायला लावण्यासाठी हा साठा चिमुर तालुक्यात आणण्यात येत होते. या सर्व प्रकरणामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिमुर तालुका व चिमुर मतदारसंघ सुरक्षित नाही आणि अशा वातावरणात निवडणुका सुदधा शांततेत पार पाडणार नाही.हेही यावरून स्पष्ट होत आहे.हि बाब अत्यंत गंभीर असुन यामध्ये भाजपाच्या स्थानिक आमदाराची सुदधा चौकशी होणे आवश्यक आहे. या व्यवसायाचे धागेदोरे लांब असुन बोगस खते, बोगस तंबाखु व गुटखा चिमूर तालुक्यात विक्री केली जात आहे. तंबाखू तसेच गुटखा हा व्यवसाय मध्य प्रदेश याठिकाणी जोरात विक्री केली चालत आहे. कारण या ठिकाणी तंबाखु व गुटखा हा अतिशय स्वस्त दरात मिळत असल्याची माहिती आहे. चिमुर तालुक्यात विकण्यात येतो तो तंबाखु निकृष्ट दर्जाचा आहे. जनतेच्या जिवाशी व आरोग्याशी खेळणारा हा प्रकार आहे अशा बोगस तंबाखु व गुटखा तस्करी प्रकरणाचा छडा लावुन माफिया आरोपीची कसुन चौकशी करून या संपूर्ण टोळीचा पर्दापाश करावा करावा अशी मागणी चिमूर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पत्रकार परिषद घेऊन उपविभागीय अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्व्यक चिमूर विधानसभा डॉ.सतिश वारजुकर, चिमूर तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे पाटील, चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके, उपाध्यक्ष राजेश चौधरी ,विलास मोहिणकर तालुका सरचिटणीस , जेष्ठ नेते विवेक कापसे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजयी डाबरे,उपाध्यक्ष ऍड.वंजारी, माजी नगरसेवक नितीन कटारे, मीडिया प्रमुख पप्पू शेख,बंडू हिवरकर,श्रीकांत गेडाम, सुधीर जुमडे,सुधीर भोयर,मंगेश घ्यार, अक्षय लांजेवार,बाळू बोबाटे,मिलिंद सहारे, रोशन नंन्नावरे,उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]