"खाऊचे पैसे चिऊला" नवभारत कन्या विद्यालयात उपक्रम
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून आज नवभारत कन्या विद्यालय मुल येथे "चिमणीसाठी घरटे", "खाऊचे पैसे चिऊला" हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार होत्या. यावेळी विशेष मार्गदर्शक म्हणून स्पॅरो फाउंडेशन महाराष्ट्राचे सदस्य राहुल आगळे उपस्थित होते.
कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक दिनेश जिड्डीवार संतोष गवारकर, कार्तिक नांदुरकर, राकेश नखाते यांनीही उपस्थिती दर्शविली.
पर्यावरण रक्षणाकरिता चिमणीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून आपल्या सर्वांचे बालपण चिऊताई सोबत गेले. त्या चिऊताईसाठी आपण घरटे बांधूया असे आवाहन श्रीमती राजमलवार यांनी केले.
यावेळी राहुल आगळे यांनी टाकाऊ वस्तु पासून चिमणीसाठी घरटे तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर चिमणी साठी घरटे तयार करून चिमणी संवर्धनाचा संकल्प केला कार्यक्रमाचे संचालन विजय सिद्धावर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]