महिलांशिवाय देशाची प्रगती नाही... वृंदा संतोष पगडपल्लीवार

महिला दिनाच्या निमित्ताने....
....विशेष लेख....
वार नाही तलवार आहे
ती तर समशेराची धार आहे
स्त्री म्हणजे अबला नाही
ती तर धगधगती तलवार आहे....
          ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण आज प्रत्येकाला कळून चुकले आहे की देशातील महिलांच्या प्रगती शिवाय देशाची प्रगती होणार नाही.
सध्याची समाजातील महिलांची भूमिका बघितली तर गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यात लक्षणीयरित्या बदल झालेला दिसून येते. आणि आजच्या घडीला तर महिला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण आणि वैविध्यपूर्ण भूमिका निभावताना दिसून येत आहेत . 
गृहिणी पासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास व्यावसायिक क्षेत्रात तसेच राजकारणात सुद्धा महिलांनी खूप मोठा पल्ला गाठलेला दिसून येत आहे. .महिलांनी प्रत्येकच क्षेत्रात आपली योग्यता आणि क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.समाजातील महिलांच्या भूमिकेतील सर्वात लक्षणीय  घडामोडी पैकी  एक म्हणजे त्यांच्या अर्थाजनाच्या प्रकियेत खूप मोठा सहभाग दिसून येत आहे ..
पूर्वी स्त्रिया मुख्यतः घरगुती कामातच मर्यादित होत्या आणि त्यांना शिक्षण किंवा करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नव्हते. परंतु अलीकडच्या काळात महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. ..महाराष्ट्र शासनाने स्त्रिया पुढे याव्यात व त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव  होऊन, त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कामास हातभार लावावा या उद्देशाने शासन अनेक योजनांचा पुरस्कार करत आहेत.आणि म्हणूनच शासनाच्या सोयी सुविधांचा लाभ घेत महिला भरारी घेऊ लागल्या आहेत.प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली छाप वाढवली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात महिला समर्थपणे उभ्या आहेत. आज खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आणायची असेल तर सर्वच क्षेत्रात महिलांना समान संधी उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे.महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात शक्ती असूनही तिच्या सक्षमीकरणासाठी शासनाला बरेच प्रयत्न करावे लागत आहे.देशाच्या विकासात महिलांचे महत्त्व आणि अधिकार याबद्दल समाजात जागरूकता आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.अनेक योजना या रोजगार शेती आणि आरोग्य सारख्या गोष्टीशी संबंधित आहेत आपल्या देशातील महिलांची परिस्थिती लक्षात घेऊन या योजना तयार केलेल्या आहेत."बेटी बचाव बेटी पढाओ" यासारख्या योजनांच्या माध्यमातून जनजागृती केल्या जात आहे. आज देशातील महिला जागृत झाल्या आहेत आजची स्त्री ही तर घर आणि संसारिक जबाबदारी पार पाडून अधिक चांगले कार्य करू शकते याची जाणीव झालेली आहे.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आजच्या स्त्रिया सर्वात मोठ्या कार्यक्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत.मग ते मजुरीचे काम असो की अंतराळातले काम असो प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व महिलांनी सिद्ध केलेले आहे..
महिला सुशिक्षित सक्षम, समृद्ध आजही आहेत. उद्याही असतील आणि इथून पुढेही होतील पण आपल्या पुरुष प्रधान समाजाने हे स्वीकारायला हवे.तिच्याविषयी आदर बाळगायला हवा या समाजातील प्रत्येक महिला तसेच रस्त्याने जाणारी प्रत्येक मुलगी ही एकटी नसून ती आपली किंवा माझी जबाबदारी आहे. हे स्विकारले पहिजे,तर नक्कीच  स्त्रियांच्या सामाजिक मानसिकतेच्या बेड्या तुटतील आणि आपला समाजातील  माणुसकीच्या प्रवासातील हे क्रांतिकारी मोठ्ठं पाऊल ठरेल.यात अजिबात शंका नाही.....
- वृंदा संतोष पगडपल्लीवार 
सावली
9421720175

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]