वाॅटसफ वर अश्लील पोस्ट टाकणे पडले महागात ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास कुळमेथेवर गुन्हा दाखल
तळोधी (बा.) नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येतं असलेल्या सोनुली (खुर्द) येथिल व देवपायली गटग्रामपंचायतचे सदस्य असलेले तुळशीदास कुळमेथे यांनी नागभिड येथिल एका शिक्षकांचे वाॅटसफ नंबर व इतर वाॅटसफ गूपवर अश्लिल पोस्ट वायरल करून बदनामी केल्याची तक्रार केल्याने नागभिड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार नागभिड येथिल रहिवाशी असलेले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसंबी (खंड) येथे कार्यरत असलेले शिक्षक अरून पेंदाम हे फावल्या वेळेत ग्रामगीता व  गुरूदेव सेवेचा प्रसार व प्रसिध्दी करण्याचें काम करतात. एक सभ्य व प्रामाणीक व्यक्ती म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे कार्य करणाऱ्या अरून पेंदाम यांचे आक्षेपार्थ व बदनामीकारक पोस्ट वाॅटसफ गूप व त्यांचे स्वतःचे मोबाईल नबंर वर (ता. २३ फेब्रु.)ला रात्रौ ८ वाजताचे दरम्यान वायरल करून बदनामी करण्याचा प्रयत्न तुळशीदास कुळमेथे यांनी केला. दरम्यान याबाबत त्यांच्याशी  अरुन पेंदाम संपर्क साधून विचारणा केली असता तेव्हा उलटं पेंदाम यांनाच कुळमेथे यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सदर इसम हा देवपायली गटग्रामपंचायतचा सदस्य असुन स्वताला गुरूदेव भक्त म्हणून या परिसरात वावरत असुन सभ्य व प्रामाणीक व्यक्तींना त्रास देणे, व विनाकारण सभ्य व्यक्तींचे बनावटी फोटो काढून वाॅटसफ, इंस्टाग्रामवर, फेसबुक, यावर वायरल करण्याची भाषा बोलने, पैसाची मागणी करणे आदी विविध कारनामे या व्यक्तींचे असल्याचे अरून पेंदाम यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत नागभिड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता. आरोपी तुळशीदास कुळमेथे सोनुली (खुर्द) यांचेवर फौजदारी कारवाई अतंर्गत भा.द.वी. कलम १८६० अन्वये कलम २९४, ५०१, ५०६, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन सायबर क्राईम अतंर्गत पुढील तपास नागभिड पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]