बल्लारपूर पोलिसांची कारवाई, २४ पेटी दारू सह स्कॉर्पिओ सहित ७ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांनी धडक कारवाई करीत २४ पेटी दारू सह स्कॉर्पिओ सहित ७ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, बल्लारपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात अवैधरीत्या दारू ची खेप जाणार आहे. त्यानुसार बामणी येथील एसएसटी पॉइंट च्या मागे सापळा रचून नाकाबंदी २४ पेटी देशी दारू रॉकेट संत्रा सह एक स्कॉर्पिओ असा एकूण ७ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केले असून सचिन उर्फ भांजा राजु अडलाकोंडावार रा. महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर व निखिल आत्माराम वनकर रा. विद्यानगर वार्ड बल्लारपूर यांना अटक केले. येथील आरोपी सचिन उर्फ भांजा राजु अडलाकोंडावार रा. महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर हा तडीपार गुन्हेगार असून त्याच्या वर १८ गुन्ह्याची नोंद आहे. त्यात दारू, मारामारी तसेच आर्म अॅक्ट चे गुन्हे आहे. तो १९ डिसेंबर २०२३ पासून तडीपार होता. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, सयाम शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, पोलीस अंमलदार लखन चव्हाण, संतोष दंडेवार यांनी केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक असिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार पांडेय करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]