ट्रॅक्टर व ट्रकच्या धडकेत मजुराचा घटनास्थळीच मृत्यू

चिमूर शहरातील शेडेगाव येथील घटना 

रेती माफियांवर कडक कारवाई केली नाही तर वाढेल गुंडगिरी

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - ०३/०२/२०२४ ला  रात्रीच्या अंधारात अंदाजे ०१:०० वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर ने अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना चिमूर वरून ४ कि.मी. अंतरावरील शेडेगाव खडसंगी मार्गावर भरधाव वेगाने रेतीने भरलेले ट्रॅक्टर नेत असतांना ट्रक व ट्रॅक्टर ची आमोरा - समोर जोरदार धडक झाल्याने ट्रॅक्टर मुंडयावर बसून असलेला मजुर सचिन सोनवाने राहणार शिवापूर बंदर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून ट्रॅक्टर चालक प्रवीण कामडी राहणार शिवापूर बंदर हा तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला असून मृतकाचे शव शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. तसेच ट्रॅक्टर मालक सुद्धा फरार असल्याची चर्चा आहे. पोलीसांची शोध मोहीम सुरू झाली आहे.या सर्व घटनेला जवाबदार पोलीस प्रशासन तसेच वन व महसूल विभाग असून सर्रासपणे दैनंदिन चिमूर शहरातील मुख्य मार्गाने रोड दुभाजकावर पोलिसांनी लावलेला तिसरा डोळा म्हणजे CCTV कॅमेरा यामध्ये हा रेती माफियांचा खेळ उघड्या डोळ्यांनी बघून पोलीस कारवाई करण्यास दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. यामुळे रेती माफियांची दादागिरी वाढत चालली असून सर्रासपणे रेतीने भरलेले ट्रॅक्टर भरवेगात जंगलातून तसेच राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरून चालविले जाते.मुख्यमंत्री महसूलमंत्री जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी , तहसीलदार , वनपरिक्षेत्र अधिकारी , मंडळ अधिकारी , तलाठी व पोलीस यांना अनेक निवेदने तसेच तक्रारी देऊन सुद्धा पोलीस कारवाई का करीत नाही ? यांची या रेती माफियांसोब हातमिळवणी तर नाही ना असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित झाला आहे. हि घटना पहिली नसून अशा घटना चिमूर तालुक्यात अनेक घडल्या आहेत. अनेक मजुरांना जीव गमवावा लागला आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने दिवस असो अथवा रात्र मजुरी कमविण्यासाठी असला मृत्यूचा खेळ खेळावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी माजी सेवानिवृत्त सैनिक तथा वनरक्षक गदगाव वन परिक्षेत्र ऋषी बानुसा हजारे वय ५६ वर्षे यांना गोंडपीपरी तहसीलचा बाबू असलेला राकेश झिरे नावाचा रेती माफिया यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतांना देखील कसलीही भीती न बाळगता हा चोरीचा खेळ मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे.तरीही शासनाला जाग आली नाही तर हा खेळ असाच सुरू राहील यात काही शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]