महाराष्ट्रात नावाजलेला असलेल्या निमढेला सफारी गेटमधून रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक...लाखो रुपयांचा चुना कोणाच्या आशीर्वादाने ?


वरोरा.....जगदीश पेंदाम

गौण खजिनाची अवैध उत्खनन करून मालामाल होण्याची स्पर्धा सगळीकडे पाहायला मिळत आहे बांधकाम करण्यासाठी रेतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याने यासाठी रेती कुठूनही रात्री तस्कर उत्खनन करत असतात वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी (बफर )अंतर्गत येत असलेल्या रामदेगी देवस्थान मध्ये रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अवैध्य रित्या रेतीची वाहतूक सुरू आहे या अवैद्य रेती  वाहतुकीला आशीर्वाद कोणाचे असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे....

रामदेगी हे जिल्ह्यासह विदर्भात नावाजलेलं पर्यटन स्थळ याच ठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्रात गाजलेलं निमढेला सफारी गेट (बफर) आहे रामदेगीत वन्य प्राण्यांच्या वावर असून वाघ, बिबट, अस्वल रानगवा, चितळ, नीलगाय मोर, अनेक प्राणी पक्षी या ठिकाणी  पर्यटकांना दर्शन देत असतात,..  


रामदेगी निमढेला गेट परिसरात भानुसखिंडी व तिचे बछडे, बबली, नयनतारा यांचा अधिवास असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी पाहायला मिळत असून हिवाळात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा गेट सर्वात पर्यटकांसाठी हाउसफुल चालत आहे, या गेटमधून रामदेगी येथे भाविकांना जाण्यासाठी सायंकाळी पाच नंतर बंदी असते परंतु रात्रीच्या कर्कस आवाजात अवैद्य रेती घेऊन चालणारे ट्रॅक्टर यांना मात्र खुलेआम जाण्यास मार्ग मोकळा आहे सायंकाळी चालणाऱ्या कर्कश ट्रॅक्टरच्या आवाजात वन्य प्राण्यांसहित पशुपक्ष्यांची झोप उडवत आहे, याला जबाबदार कोण ? कोणाचे आशीर्वाद असा प्रश्न सध्या परिसरात नागरिकांच्या मनात निर्माण झालेला आहे, निमढेला पर्यटक गेटमधून अर्जुनी, निमडला परिसर रस्ता,चौकी घाट, मोडका पूलिया,परिसरातील छोटी नदी नाली इथून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टरच्या सहाय्याने निमढेला गेटमधून रामदेगी येथे होत आहे रात्रीच्या सुमारास निघणारे, अधिवास करणारे वन्य प्राणी, पशुपक्षी यांना मात्र ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजापासून त्यांच्या जीवनातील अधिवासापासून वंचित राहावे लागत आहे तसेच त्यांच्या दिनचर्यावर व शिकारीवर परिणाम होताना दिसत आहे.
शासन निर्णयाप्रमाणे रेती उपसा सूर्योदय आदी सूर्योदय नंतर करता येत नाही परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत युद्धपातळीवर खडसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मार्फत सर्रासपणे अवैध रेती सुरू आहे असे परिसरातील जनतेकडून बोलले जात आहे.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]