मूल नगर परिषदेच्या दुकान गाळ्यांना मूल वासीयांचा थंड प्रतिसाद

मूल नगर परिषदेच्या दुकान गाळ्यांना मूल वासीयांचा थंड प्रतिसाद

केवळ एकानेच घेतले दुकानाचे गाळेमूल—चंद्रपूर रस्त्याचे मार्गावरील नाट्यगृहाचे बांधकाम पाडून त्यावर 13 कोटीच्या वर खर्चुन चंद्रपूर रोडवर बांधलेल्या दुकान गाळ्यांना मूल वासींयानी थंड प्रतिसाद दिला आहे.  नगर परिषदेने निर्धारीत केलेल्या तारखेला 61 पैकी केवळ एकाच गाळ्याला 'मालक' मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल या नावांने भव्य—दिव्य इमारत उभी झाली आहे.  तीन मजली या देखण्या इमारतीत लिफ्टसह अनेक सुविधा आहे.  शहरातील मॉललाही लाजवेल अशा इमारतीत मात्र व्यवसाय थाटण्यांस मूल वासीयांनी नकार दिला आहे.

केवळ गाळा क्रमांक 11 चा लिलाव झाला असून, हा गाळा मूलचे काजू खोब्रागडे यांनी 3,95,000/— रूपये बोली लावून घेतला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार राजू कन्नमवार व अनुप गोवर्धन यांनी या गाळ्याकरीता बोली लावली होती, त्यात काजू खोब्रागडे यांना हे गाळे मिळाले. 

अजून कोणी दुसरे गाळे घेतले नाही, कोणता व्यवसाय येथे चालेल हे सांगता येत नाही, त्यामुळे केवळ गाळे तेवढे घेतले, व्यवसायाबाबत अजून निर्णय नसल्यांचे मत काजू खोब्रागडे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.

मुख्य रस्त्यावर दर्शनी भाग नसणे, अवाक्याबाहेरचे ना परतावा असलेले अधिमुल्य रक्कम, मेन्टेनन्ससह वर्षभरांचा आगावू किराया आणि किरायाची रक्कमही न परवडणारी असल्यांने मूलच्या बेरोजगारांनी या व्यापार संकुलाकडे पाठ​ फिरविली आहे.  एवढी रक्कम देवूनही, ज्या ऐरियात हे संकुल थाटले आहे, तीथे व्यापारवृध्दी होईल? यावर अनेकांचे प्रश्नचिन्ह असल्यांने, नगर परिषदेने या व्यापार गाळ्यांच्या लिलावाची मोठी जाहीरात करूनही, इच्छुकांना या संकुलाची भुरळ पडली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाचे दर्शनी भाग चंद्रपूर मुख्य मार्गाचे बाजूने असायला हवे होते, ही बाब या संकुलाचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्टपणे बोलून दाखविले होते.

कोट्यावधी रूपये खर्चुन बांधलेल्या या व्यापार संकुलात 61 पैकी केवळ 1 च गाळे किरायाने गेल्यांने, या संकुलाचे भवितव्य काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]