जन्मदात्या बापाने दोन मुलींची व पत्नी ची केली हत्या.!


(तिहेरी हत्या कांडाने हादरले मौशी; नागभीड तालुक्यातील घटना)
यश कायरकर (नागभीड):

नागभीड: नागभीड पासून 15 किमी अंतरावर असलेल्या मौशी या गावात तिहेरी हत्याकांड घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.. जन्मदात्या दारुड्या बापाने आपल्या दोन मुली व पत्नी चा कुऱ्हाडीने वार करून पहाटे खून केला.. अंबादास लक्ष्मण तलमले (45) असे त्या नराधम पित्याचे व पतीचे नाव आहे.. मुलगा अनिकेत तलमले (16) हा गावातीलच एका पानठेल्यात खर्रा घोटायला अगदी पहाटे 4 वाजता निघून गेल्याने आरोपीने ही संधी साधून भल्या पहाटे तिघीही मायलेकीची कुऱ्हाडीने डोक्यावर पोटावर वार करून हत्या केली.. मुलगा अनिकेत हा खर्रा घोटायला मजुरीने बाहेर गेला असल्याने तो थोडक्यात बचावला.. मृतामध्ये  सौ. अल्का अंबादास तलमले (40), मुली प्रणाली अंबादास तलमळे (19), तेजस्विनी आंबादास तलमले (19)  तर आरोपीच्या मोठ्या मुलीचे नागभीड तालुक्यातील चिखल परसोडी येथे एक वर्षापूर्वी लग्न झालेले आहे.. मुलगा अनिकेत दहावीत  कृषक विदयालाय मौशी येथे शिकत असून तो दहावीचे पेपर देत आहे तर मृतक तेजस्विनी ही सुद्धा कृषक विद्यालय मौशी येथे 12 विचे पेपर देत आहे.. आरोपी अंबादास  तलमले हा नेहमी दारू पिऊन पत्नी व मुलींना त्रास द्यायचा. दारू पिण्या साठी वारंवार पैश्याची मागणी करायचा. आरोपीच्या पत्नी व दोन्ही मुली मोल मजुरी करायच्या.सदर आरोपी हा गेल्या तीन महिन्यापासून झोपतांना कुऱ्हाड घेऊन झोपायचा.पत्नी व मुलींनी विचारले असता स्वतःच्या रक्षणासाठी घेऊन झोपतो असे उत्तर द्यायचा.आरोपी गावातील अनेकांशी हुज्जत घालायचा 15 दिवसापूर्वी गावातील एका घरी शिरून त्याने टीव्ही फोडल्याची माहिती मिळाली.!
   सदर घटना स्थळी चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांनी भेट दिली.. उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात  ठाणेदार विजय राठोड व पोलीस अधिकारी  चौकशी करीत आहेत.!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]