चिमणी जगवा - विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रमWorld Sparrow Day 2024 : चिऊताई जगावी! आज जागतिक चिमणी दिन, पहा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
मूल जि. चंद्रपूर - आज जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्या मंदिर कॉन्व्हेंट मूल येथील विद्यार्थ्यांनी 'चिमणी वाचवा-चिमणी जगवा या 'विशेष उपक्रमांतर्गत टाकाऊ पाण्याच्या बाटलीपासून आकर्षक असे जलपात्र तयार केले. याद्वारे या शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमण्यांच्या अन्न- पाण्याची सोय केली आहे.
विद्यार्थ्यांनी पाण्याच्या वाया गेलेल्या बाटल्या, रिकामे डबे, प्लास्टीकची झाकणे यांचा वापर करून चिमण्यांसाठी आकर्षक तयार करून चिमण्यांच्या दाण्या-पाण्याची सोय केली आहे. हे निवारा व जलपात्र परिसरातील झाडांवर, घरातील बाल्कनी, गच्चीवर ठेवण्यात आले. एकाच फिडरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य व पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चिमण्यांच्या घटत्या संख्येचा विचार करता 'चिमणी वाचवा-चिमणी जगवा' हा अभिनव उपक्रम राबवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]