२२५ निरक्षरानी दिली साक्षरतेची परीक्षानवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आज घेण्यात आलेल्या असाक्षर नागरिकांच्या परीक्षेत मारोडा केंद्रावर २२५ असाक्षरांनी परीक्षा दिली अशी माहिती केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे यांनी दिली.
२०२७ पर्यंत संपूर्ण भारतात निरीक्षणाची संख्या शून्य करण्याचे उद्देश ठेवून असाक्षर नागरिकांचा सर्वेक्षण करण्यात आला‌. या असाक्षरांची नोंदणी उल्हास ॲपवर करण्यात आली. नोंदणी झालेल्या सर्व अस अक्षरांची आज देशभरात परीक्षा घेण्यात आली. १८ ते त्यापुढील सर्व असाक्षरांनी ही परीक्षा प्रत्येक शाळेत दिली. शाळेचे मुख्याध्यापक हे केंद्र संचालक म्हणून काम केले.
मोहोळ तालुक्यातील मारोडा केंद्रावर वीस शाळेत ही परीक्षा घेण्यात आली. या वीस केंद्रावर २२७ असाक्षरांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात येणार आहे.
असाक्षराचे नोंदणी झाल्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वयंसेवकांनी या असाक्षरांना साक्षर करण्याचे कार्य केले हे उल्लेखनीय.
गटशिक्षणाधिकारी श्रीमती वर्षा पिपरे यांचे मार्गदर्शनात ही परीक्षा घेण्यात आल्याचे श्री कोरडे यांनी सांगितले.
नवभारत कन्या विद्यालयात १२ असाक्षरांनी दिली परीक्षा


मूल येथील नवभारत कन्या विद्यालय येथे सर्वेक्षणात आढळून आलेल्या १२ असाक्षरांनी आज उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत परीक्षा दिली.
मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार केंद्र संचालक म्हणून कार्य केले तर ज्येष्ठ शिक्षक छत्रपती बारसागडे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
95 वर्षीय निरक्षर अमरतबाई भीवजी उपाध्ये, नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत नवभारत कन्या विद्यालय मुल येथे परीक्षा देण्याकरिता आपल्या नातवंडांना घेऊन आली हे येथे उल्लेखनीय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]