६५ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याने केला हल्ला

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अलिझंझा बफर वन परिक्षेत्रालगत ची घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. ०७/०३/२०२४ चिमूर तालुक्यातील अलिझंझा येथील शेतकरी भगवान झित्रू चौखे हे स्वतःच्या शेतात सकाळच्या सुमारास शेतातील कामे करण्यासाठी गेले असता ११ वाजताच्या सुमारास तहानलेल्या गायींना पाणी पाजण्यासाठी शेताजवळील नाल्यावर नेले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने भगवान झित्रू चौखे यांच्यावर अचानकपणे हल्ला चढविला व आरडा ओरड केल्याने आजू बाजूचे शेतकरी तात्काळ धावून आले तसेच बिबट्याला हाकलून लावले परंतु झित्रू चौखे हे शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ सफारी करीता वापरल्या जाणाऱ्या जिप्सी या वाहनाने प्रथमोपचार करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच क्षणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस चे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस  गजानन बुटके यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमीवर उपचारासाठी डॉक्टरांना सांगितले तसेच तात्काळ जखमीवर उपचारासाठी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तात्काळ आर्थिक मदत करावी असे वनरक्षकास सांगितले.तसेच हा प्रकार पहिला नसून अशा अनेक घटना या क्षेत्रात घडल्या असून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जीव मुठीत धरून शेती करावी लागत आहे.व पुढील तपास बफर वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी येथील वनरक्षक करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]