आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर यांच्या वतीने निरोप समारंभ

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - दिनांक. २३/०३/२०२४ शनिवारला आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील प्रात्यक्षिक कार्य अंतर्गत एम. एस.डब्लू द्वितीय वर्ष भाग ४ च्या प्रशिक्षणार्थी यांच्या माध्यमातून अंगणवाडी केसलापुर येथे निरोप समारंभ घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन आयोजित केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी सेविका श्रीमती. सूर्वणा देहारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.खंगार सर उपस्थित होते. प्रात्यक्षिक क्षेत्रकार्य शहरी भागातील गटकार्य अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रा.डॉ खंगार सर यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजकार्य ही एक कला आहे आणि समाजकार्य करीत असतांना स्वतःला झोकून द्या.असे प्रामुख्याने सांगितले.
समाजकार्य प्रशिक्षणार्थी यांनी समुदायामधे गटकार्य करीत असतांना केसलापुर येथील पुलावर लाईट ची व्यवस्था नसल्याने चिमूर येथील नगरपरिषद कार्यालयाला गावातील लोकांच्या संमतीने रितसर निवदेन मुख्याधिकारी सन्मा.राठोड मॅडम यांना दिले.राठोड मॅडम यांनी तत्काळ कार्यवाही करून पुलावर लाईट ची व्यवस्था केली. समाजकार्य प्रशिक्षणार्थी यांनी केसलापुर गावातील ही एक समस्या सोडविली.आणि अंगणवाडीला राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा भेट दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकार्य प्रशिक्षणार्थी तथागत कोवले यांनी केले तर आभार चंदन पाटील यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजकार्य प्रशिक्षणार्थी वीरेंद्र मेश्राम,अजय कटारे,आशा शेंडे,दीक्षा पेटकर,मयुरी खापने,मयुरी मोरे,योगिता खोब्रागडे,वैष्णवी नागरकर,वैष्णवी मोकाशी आणि  शिवानी नन्नावरे,कोमल ताडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]