पारडपार येथे स्वस्त धान्य दुकानात तनावाचे वातावरण

पहील्यांदा मागील महिन्याचे वाटप करा नंतरच या महिन्याचे वाटप करा

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमुर : - तालूक्यातील मौजा पारडपार येथे स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप करताना गावातील नागरीकांचा विरोध आणि रोष पहिल्यांदाच दिसून आला. मागील महिन्याचे राशन ( धान्य ) अगोदर वाटप करा तरच या महिन्याचे धान्य वाटप करा अशी भुमिका गावातील नागरीका कडून घेण्यात आली.या गावातील स्वस्त धान्य दुकानाचे वाटप आंबेनेरी सोसायटीकडे असल्याने धान्य वाटप करणाऱ्या दुकानदाराने धांन्याची हेरा-फेरी केल्याची शंका गावातील नागरीकांनी व्यक्त केली व धान्य वाटप करणाऱ्या दुकानदाराने अनेक लाभार्थीचे थम घेऊन पावती काडून पावती मागे धान्य देणे आहे अश्या प्रकारे लिहून सही देऊन लाभार्थीना पावती देण्यात आली. आणि काही नागरिकांना मी उद्याला वाटप करणार आहे कार्ड इथेच ठेवा अश्या प्रकारची सुचना देऊन नागरीकाना फसवण्याचे कार्य दुकानदाराकडून करण्यात आले. मागच्या महिन्याचे वाटप न केल्याने नागरीकांमध्ये रोष निर्माण झाल्याने दुकाना समोर काही वेळ तनावाचा वातावर पाहायला मिळाला.या सर्व प्रकरणाची चौकसी तहसीलदार तसेच पुरवठा अधिकारी यांचेकडून करण्यात यावी अशी मागणी गावालील नागरिकांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]