नागभीड ग्रामीण रुग्णालय (दंत )विभागाचा उपक्रम..!!

'पीट अँड फिशर सिलॅंन्ट' पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून 245 विद्यार्थ्यावर दंत उपचार..!!!


नागभीड: विद्यार्थ्यामधील दातांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता 16 जानेवारी रोजी नागभीड तालुक्यातील 725 विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय नागभीड च्या दंत विभागाच्या डॉ. सविता काटेखाये  यांनी केली होती.. त्यापैकी दात किडीची व अन्य समस्या असलेल्या 245 विद्यार्थ्यावर आज दिनांक 5 मार्च रोजी कर्मवीर विद्यालय नागभीड येथील स्व. वसंतराव कसबेकर सभागृहात उपचार करण्यात आले..!!
   राष्ट्रीय मौखीक कार्यक्रम अंतर्गत शाळा आधारित 'पीट अँड फिशर सिलॅंन्ट' या पथदर्शी उपक्रमाचे उदघाटन आज कर्मवीर विद्यालयात झाले.. या प्रसंगी उदघाटन म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी यांची उपस्थिती होती तर अध्यक्ष स्थानी कर्मवीर विदयालयाचे प्राचार्य देविदास  चिलबले सर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सविता काटेखाये दंत विभाग ग्रामीण रुग्णालय नागभीड, दत्ता मेघे दंत महाविद्यालय सावंगी (मेघे) येथील डॉ. ऋतुजा पाटील,डॉ.पलक अग्रवाल, डॉ. जानव्ही भोसले, डॉ. खुशी झवर यांची उपस्थिती होती.. या उपक्रमात कर्मवीर   विद्यालय नागभीड, सरस्वती ज्ञान मंदिर नागभीड, जनता कन्या विदयालय नागबभीड, जिल्हा परिषद बेसिक शाळा नागभीड, जिल्हा परिषद कन्या शाळा नागभीड येथील विद्यार्थ्यावर उपचार करण्यात आले..!!
      सदर कार्यक्रमाचे संचालन ग्रामीण रुग्णालय नागभीड हे राजीव खोब्रागडे यांनी केले तर तर सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी  अनिता काटेखाये व कर्मवीर विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले..!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]