नवभारत कन्या विद्यालय मूल च्या वतीने मतदान जनजागृती रॅलीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नवभारत कन्या विद्यालय मूलच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
'मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो', 'मतदानाचा हक्क बजवा, लोकशाही सुदृढ करा' असे नारे देत विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थिनींनी आज शिस्तबद्ध रांगेत मूल शहरातून जनजागृती रॅली काढली.
निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, मतदार संपूर्तीने मतदान केले पाहिजे आणि लोकशाहीत आपला सहभाग वाढविला पाहिजे यासाठी ही जनजागृती रॅली काढण्यात आली.
नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे मार्गदर्शनात ही रॅली काढण्यात आली. रॅलीत ज्येष्ठ शिक्षक विजय सिद्धावार, प्रफुल्ल निमगडे, शैलेश देवाडे, धीरज धोडरे, उज्वला चहांदे, अर्चना बेलसरे, मंजुषा पंधरे, राकेश नखाते, राखी चिवंडे इत्यादी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]