चोरांचा सुळसुळाट, आकापूर येथे दिड लाखांची चोरी,

चोरांचा सुळसुळाट, आकापूर येथे दिड लाखांची चोरी,

तळोधी बा: येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आकापूर येथील सरपंच कुणाल हरिश्चंद्र गहाणे हे आपल्या संवगडी सोबत एक मार्च रोजी अयोध्या येथे देवदर्शन करण्यासाठी गेले असता  घरी पत्नी व मुलगी समोरच्या व्हरांड्यात झोपी गेले असताना चोरट्यांनी मागच्या दारातून प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याची गोफ, मंगळसूत्र, सोनेरी टाप्स,नथ,व डोरले असा एकूण दिड लाखांच्या वर चोरट्यांनी माल लंपास केला.त्याच दिवसी आकापूर येथील टेमदेव नररू भाकरे यांच्या घरी रात्री १२ वाजता चोरट्यांनी समोरच्या दरवाजा ताला तोडून अंदर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र लेझर लाईट चा प्रकाशामुळे घरच्या झोपलेल्या लोकांना जाग येताच चोरांनी समोरच्या दरवाजा हडल लावून ठेवल्या मुळे मागील दारातून निघून पाहिले असता चोरी करणाऱ्या चोर फरार झाले.त्यामुळे या परिसरात चोरांची दहशत निर्माण झाली आहे.तसेच या तळोधी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावांत गेल्या पंधरवड्यात अनेक शेतकऱ्यांचे शेतातील मोटार पंप,वायर बंडल, ट्रॅक्टर ची बॅटरी,व हाँटेलमध्ये चोरी चे प्रमाण वाढले आहे.तळोधी बा.पोलीस स्टेशन मध्ये ४२ गावाचा समावेश असून या ठिकाणी कर्मचारी संख्या अपुरी पडत असल्याने चोरी करणाऱ्या चोर संधीचा फायदा घेऊन या परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकारी वर्गाने तळोधी पोलिस स्टेशन मध्ये कर्मचारी रिक्त जागा त्वरित भरून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]