पोलीस स्टेशन भिसी कडून ट्रक ड्रायवर व अवैधरित्या रेती वाहतूक करणारा ट्रक जप्त

पुयारदंड येथील नागरिकांकडून  अवैधरित्या रेती वाहतुकीच्या विरोधात हल्लाबोल

रेतीने भरलेला ट्रक गावातील युवकांच्या अंगावर चढविण्याचा केला प्रयत्न

अनेक ट्रक पळून गेले

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२९/०३/२०२४ शुक्रवार ला सकाळी गुड फ्रायडे या सरकारी सुट्टीचा फायदा घेत रेतीने भरलेली वीस,बावीस ट्रक पुयारदंड, गडपिपरी, आंबोली व भिसी  या परिसरात आडमार्गाने लपवण्याचा प्रयत्न दोन तासापासून करीत होते. याच वेळी पुयारदंड गावाजवळ गोठाणगाव फाट्याजवळ  सकाळी १० वाजता अवैधरित्या रेतीने भरलेला ट्रक MH 40 Y 9891 हा उभा होता. गावातील युवकांनी विचारपूस केली.असता ड्रायवर नी ट्रक चालू करून कोणतीही परवा न करता युवकांच्या अंगावर ट्रॅक चालवीण्याचा प्रयत्न करून पळ काढला. व त्या युवकांनी आरडा ओरड केले व गावातील महिला, पुरुष आणि पत्रकार यांनी सरळ रोड कडे धाव घेतली. तेव्हा ट्रकचे फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असलेले पत्रकार यांचे अंगावरही तो ट्रॅक चालवीण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला संरक्षनासाठी दगड फेक केली तेव्हा ट्रक ड्रायवर नी ट्रक थांबावीला व ट्रक ची चावी घेऊन चालक पळून गेला. सदर घटनेची माहिती भ्रमण ध्वनीवरून पोलीस अधीक्षक ( SP ) साहेब चंद्रपूर यांना दिली असता त्यांनी भिसी पोलीस स्टेशन ला माहिती देऊन तात्काळ कारवाईचे आदेश दिले. भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून ट्रक व ड्रायव्हर या दोघांनाही भिसी पोलीस स्टेशन येथे जमा केले.सदर घटनेची लेखी तक्रार पुयारदंड गावकऱ्यांकडून भिसी पोलीस स्टेशन ला देण्यात आली. यानंतर अश्या प्रकारचे अवैधरित्या रेतीने भरलेली ट्रक या रोड नी चालायला नको.दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन ट्रक ड्रायवर व ट्रक यावर उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार व गावकऱ्यांकडून करण्यात आली.यामार्गे अशाप्रकारे रेतीचे हायवा ट्रक पहिल्यांदाच चालत नसून नेहमीचाच हा प्रकार आहे.आणि वैनगंगा नदीपात्रातील 'रेती' कांपा , शंकरपूर , भिसी ह्या मार्गाने  नागपूर,उमरेड,गिरड, सिर्शी या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध पद्धतीने हायवा ट्रक द्वारे रेतीची वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची संख्या वाढली आहे. तसेच रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची सुद्धा  संख्या शेकडो च्या घरात आहे.हा प्रकार मागील ६ महिन्यापासून जोमाने सुरु आहे. "विशेष म्हणजे सरकारी सुट्टी हि या तस्करांसाठी हॅप्पी डे असल्यागत आहे."या कारवाईच्या वेळेस शिवसेनेचे (उ.बा.ठा गट ) उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे, विधानसभा संघटक प्रकाश नान्हे , विधानसभा समन्वयक भाऊरावभाऊ ठोंबरे,उप तालुका प्रमुख राजेंद्र जाधव, शहर प्रमुख नितिन लोणारे, मनोज तिजारे,रोशन जुमडे व सर्व कार्यकर्ता गण व गावातील महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.सदर घटनेच्या तक्रारीवर उचित कारवाई करण्यात येईल. व यापुढे अवैध्यरित्या रेतीचे ट्रक या रस्त्यानी जाणार नाही व जात आहे अशी माहिती मिळाल्यास भिसी पोलीस यंत्रणेकडून उचित कारवाई तात्काळ करण्यात येईल. अशी ग्वाही रमीज मुलाणी पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन, भिसी यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]