मा दुर्गा ट्रॅव्हल्स च्या चालकास व प्रवाशांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर ठोस कारवाईची स्वाब संस्थेची मागणी.('उमरेड- भिवापूर हायवे वर लूटपाट व मारामारी करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याकरता स्वाब संस्थेचे तलोधी पोलीस निरीक्षक, नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकाकडे मागणे.')
तलोधी(बा.):
 1 मार्चला 'मॉ दुर्गा ट्रॅव्हल्स' ने काही प्रवासी नागपूर वरून तळोधी ला परत येत असताना उमरेड भिवापूर  मार्गावर काही अज्ञात  गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी वाहन क्रमांक एम.एच. 40 सी. एच 6891 (महिंद्रा एस.यु.व्ही.) ही गाडी ट्रॅव्हल्सच्या समोर रस्त्यात आडवी लावून ट्रावल्स अडवून न झालेल्या अपघाताबद्दल आमच्या गाडीची नुकसान झाली म्हणून पैशाची मागणी करत चालकास व ट्रॅव्हल्स मध्ये बसलेल्या प्रवाशांना जबर मारहाण केली. या संबंधित तक्रार ट्रॅव्हल्स चालकाने व प्रवाशांनी भिवापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली. मात्र त्याची अजूनही कुठली कारवाई झाली नसल्याची लक्षात येताच. 'स्वाब' संस्थेच्या वतीने आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची व रस्ता या नसेडी गुंडांकडून दहशतमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
    सविस्तर असे की गेल्या कित्येक दिवसापासून तळोधी, मूल, सिंदेवाही ,नागभीड परिसरातील काही भाजीपाला विक्रेते, व्यापारी, काही ट्रॅव्हल्स चालक, तर रेती सप्लाय करणारे ट्रक, सोबतच काही पारिवारिक गाड्यांना उमरेड परिसरातील काही गुंड प्रवृत्तीचे युवकांची एक टोळी उमरेड - भिवापूर रस्त्याच्या मध्ये, कारगाव जवळ, करांडला जंगल परिसरात आपली चारचाकी सामने आडवी लावून, नशेच्या धुंदीत हे सर्व ''तुमच्या गाडीने आमच्या गाडीचा अपघात झाला."असे खोटे आरोप करत, हुजर-तक्रार  घालित पैशाची मागणी करणे व न जमल्यास हाणामारी त्या परिसरातील एक टोळी करीत असते . यामुळे आधीच पेट्रोल डिझेल दरवाढीने व टोल नाक्यावरील पडणाऱ्या अतिरिक्त भाराने त्रस्त तळोधी, मूल, सिंदेवाही ,नागभीड , ब्रम्हपुरी, गडचिरोली परिसरातील काही व्यापारी तर इकडे चालणाऱ्या काही गाड्या चे मालक सुद्धा धास्तावले आहेत.
     मात्र या रस्त्याने नेहमी जाणे येणे करावे लागते म्हणून कोणीही तशी रीतसर तक्रार त्या परिसरात पोलीस स्टेशनमध्ये केलेली नाही. मात्र या वारंवार होणाऱ्या लूटपाटीच्या कारवायांमुळे व दोन- तीन दिवसांपूर्वी मा दुर्गा नावाच्या नागपूरकडून- मूल कडे येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरला व प्रवाशांना युवकांनी केलेल्या  जबर मारहाणी मुळे. व पुन्हा वारंवार अशा घटना घडू नये म्हणून संस्थेने यांच्या विरोधात ठळक कारवाई करण्याकरता हे पत्र तळोदी बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित सिंग देवरे यांच्या मार्फतीने नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक उमरेड पोलीस निरीक्षक उमरेड पोलीस स्टेशन तथा पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भिवापूर यांना दिले आहे. या वेळेस स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर ,जीवेश सयाम, नितीन भेंडाळे,  गोपाल कुंभले,आमिर करकाडे, गिरीधर निकुरे, हितेश मुंगमोळे, महेश बोरकर, मिनेश कुंभले, आदी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]