हजारो भक्तांनी घेतले सर्वात मोठे शिवपिंडीचे दर्शन..भटाळा येथे महाशिवरात्री निमित्त तीन दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन.
 
वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार प्रतिभा धानोकर यांनी घेतले शिवपिंडचे दर्शन..
वरोरा... जगदीश पेंदाम 

तालुक्यातील प्रसिद्ध असलेले शिल्प ग्राम भटाळा हे गाव शिल्पग्राम असून या गावाची इतिहासात नोंद आहे इथे भव्य जगात सर्वात मोठी असलेली पुरातन शिवलिंग विराजमान आहे त्यावर भव्य दिव्य मंदिर आहे याचं सोबत भवानी मातेचे मंदिर आहे याचं सोबत ऋषी तलाव आहे यात अनेक छोटे मोठे शिल्प कलाकृती आहे तसेच गावात परिसरात अनेक प्रकारच्या शिल्प मूर्ती पाहायला मिळते दरवर्षी महाशिवरात्री निमित्याने भव्य यात्रेचे आयोजन या ठिकाणी होत असून हजारो फक्त दर्शनासाठी येत असतात..
  हर हर महादेव च्या जय घोषणे भटाळा नगरी  परिसरात न्हाहून निघत असते या वर्षी देखील भव्य दिव्य तीन दिवसीय यात्रेचे आयोजन केले असुन ग्रामपंचायत भटाळा अंतर्गत  भटाळा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 8 - 9 - 10 मार्च 2024 रोज शुक्रवार, शनिवार, व रविवार या तीन दिवशी महाशिवरात्री यात्रेचा उत्सव असून या ठिकाणी भटाळा गावामध्ये हेमाडपंथी पुरातन शिव मंदिर तथा इतर शिल्प ग्राम पुरातन वास्तू आढळून येतात. या शिव मंदिराला भोंडे महादेव मंदिर या नावाने परिसरात  ओळखले जातात या मंदिरामध्ये दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवार ला सकाळी 5:00 वा घटस्थापना व आरती होतात दिनांक- 09 मार्च 2024 रो शनिवार ला रात्री 3:00 वा नंदीवर स्वार झालेले  शंकर जी यांची रथ मिरवणूक निघतात यामध्ये अनेक भजन दिंड्या सहभागी होतात व दुपारी 11:00 वा महाराजांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आणि दिनांक- 10 मार्च 2024 रोजी दुपारी 11:00 वा ह भ प महाराजांचे काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम होतो नंतर दुपारी 5:00 वाजता सर्व यात्रेकरूंना भाविक भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम होतो.
शिवरात्र निमित्त वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शिव पिंडीचे दर्शन घेत पूजा केली असुन यावेळी उपस्थित मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी सुद्धा पूजा करून दर्शन घेतलेले आहे,
   या यात्रेमध्ये तीन दिवशी लाखो भाविकांची गर्दी असतात या संपूर्ण यात्रेची नियोजन ग्रामपंचायत भटाळा यांच्याकडे असतात. सदर यांचे नियोजन व्यवस्थापन कार्य सरपंच कु. धम्मकन्या प्रकाश भालेराव व उपसरपंच  हरिदासजी रघुनाथ जाधव व सर्व सदस्य गण यांच्याकडे असते लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी ग्रामपंचायत कडून मोफत आरोग्य तपासणी ही शासकीय आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुकाने रांगेत लावण्याची व्यवस्था,मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था, तसेच पोलीस मदत तिची व्यवस्था, विद्युत व्यवस्था , भाविकांना रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था, भाविकांना दर्शनाकरिता येण्या जाण्याची व्यवस्था वरोरा एसटी डेपो यांच्याकडून ग्रामपंचायत ने केलेली असते..

बॉक्स
लाखो भावकांची व्यवस्थेचे कार्य ग्रामपंचायत भटाळा दरवर्षी करीत असतात तसेच यात्रकरूच्या हितासाठी तसेच दुकानदार बांधवांसाठी पिण्याचे पाणी. त्यांची व्यवस्था सुखरूप केली जाते त्यामुळे भाविकांना शिव मंदिर भटाळा येथील महाशिवरात्री यात्रेचा आनंद मोठया उत्साहाने भाविक घेत असतात.. 
हरिदास जाधव ग्रामपंचायत उपसरपंच भटाळा
 

दरवर्षी होणाऱ्या भटाळा नगरीमध्ये शिवरात्र उत्सवानिमित्त  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांनी शिव भक्तांसाठी पोलीस बंदोबस्त तयार केल्या असून या ठिकाणी 70 कर्मचारी कार्यरत आहे त्यामध्ये 5 अधिकारी 40 पोलीस कर्मचारी 25 होमगार्ड असा स्टाफ ठेवण्यात आलेले आहे  जेणे करून काही विपरीत परिणाम होणार नाही याची मुख्य दक्षता घेतली जाते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]