लोकसभा निवडणुकी अगोदर भानुसखिंडी पर्यटक गेट सुरू करा गावकऱ्यांचे प्रशासनाला विचारणा...
वरोरा.... जगदीश पेंदाम

वरोरा तहसीलमध्ये अर्जुनी तुकुम ताडोबा व्याघ्र प्रकल्प जंगल लगत कोरमध्ये असलेलं जवळपास 2000 हजार लोकसंख्या असलेलं आदिवासी गाव या गावाला लागून मोठ्या प्रमाणात ताडोबातील कोर जंगल असून नेहमीच वन्य प्राण्यांची हलचल असते या ठिकाणी शेतकरी मुख्य व्यवसाय ध्यान शेती करत असून शेतीला जोडधंदा दुग्ध व्यवसाय करत असतात, परंतु शेती हंगाम झाल्यानंतर येथील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर ठिकाणी भटकंती करावी लागते. 

भानुसखिंडी तेरा हा गेट पर्यटन सुरू झाल्यास परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त मिळून परिसरातील आदिवासींच्या विकासाकरीता चालना मिळेल..
तालुक्यातील पासुन 25 किलोमीटर असलेले भानुसखिंडी गेट आहे चंद्रपूर,गडचिरोली, नागपूर,वर्धा,भंडारा,यवतमाळ या जिल्ह्यातील नागरिकांना हा मार्ग जवळ असून शेगाव या ठिकाणी मोठी बाजारपेठ परिसरातील 60 ते 70 गावासाठी महत्त्वाची आहे अर्जुनी तु.येथे वन विभागाचे तिन कूटी असून जंगलाच्या रक्षणासाठी या ठिकाणी वन कर्मचारी कायमस्वरूपी राहत असतात...
काही दिवसातच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असून या अगोदर गेट सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे, भानुसखिंडी गेट पर्यटक म्हणून सुरू झाल्यास जिल्ह्यात पर्यटक वाढून परिसरातील अर्जुनी तुकुम,कोकेवाडा,सोनेगाव किनारा,वायगाव, चारगाव, धानोली आदी गावात सहित मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणाऱ्या शेगाव येथे मार्केटिंग,  ईतर धंद्याला चालना मिळेल प्रमाणात रोजगार मिळवून शेतकऱ्यांना छोटे कुटीर उद्योग उभे करण्यास मदत होऊन जिल्ह्यात विकासाला चालना मिळेल.भानुसखिंडी गेट पर्यटक सुरू करण्याकरीता ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन संबंधित अधिकाऱ्याला पाठवले असून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्यामार्फत वनरक्षक,तथा क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर,यांना माहिती सादर करण्याकरीता 2/5/ 2023 ला  वनमंत्र्यांकडून पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे...
चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबाच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी पर्यटक गेट सुरू झाले असून यामध्ये जोगापुर,बल्लारशा,जुनोना,सोमनाथ, समावेश आहे..
भानुसखिंडी परिसरात, वाघ,बिबट,अस्वल,चितळ, सांबर, निलगाय,रानगवा,अनेक वन्य प्राणी असून मोठ्या प्रमाणात पक्षी सुद्धा आहे, मागील अनेक वर्षापासून छोटा,  मटका,बबली,भानुसखिंडी, व तिचे बच्चे या वाघाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात भूरड घातलेली असून नेहमीच प्राणी गावालगत शेत शिवारात दिसत असतात, 
या परिसरात वन्य प्राण्यासाठी मुंडा,परिसर भानुसखिंडी, भानोबा,दौना,सांबरडोह,काळा आंबा  याठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी उन्हाळाचा दिवसातसुद्धा  पिण्यासाठी मिळत असल्याने नेहमीच वन्य प्राणी या ठिकाणी वास्तव करत असतात.वन्य प्राण्यांमुळे जंगलात लगत शेती पिकांचे नुकसान होत असल्यामुळे परिसरातील  हजारो हेक्टर जमीन पडीत आहे, वन्य प्राण्यांचे हमल्यात अनेक पाळीव प्राणी आतापर्यंत ठार झालेले आहे, त्यामुळे ताडोबातील भानुसखिंडी तेरा गेट सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवू विकासासाठी चालना मिळेल......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]