अज्ञात वाहनाच्या धडकेत चितड ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितड ठार
(पेंढरी - मोटेगाव मार्गावरील घटना)


सिंदेवाही -

    तळोदी (बाळापुर) वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या नेरी उपक्षेत्रातील नवरगाव - चिमूर मुख्य राज्यमार्गावरी  असलेल्या पेंढरी ते मोटेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादा चितडाचा मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उजेडात आली आहे .
    नवरगाव ते मोटेगाव मार्ग हा जंगल परिसर मार्ग असून या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असतो . कित्येकदा वाघ , बिबट , रानगवा , चितड यांचे दर्शन अवागमन करणाऱ्या वाटसरूंना होत असते . शनिवार सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत चितड जागीच ठार झाल्याची घटना उजेडात आली . घटनेची माहिती मिळताच  नेरी येथील क्षेत्र सहाय्यक चंद्रशेखर रासेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मुका पंचनामा  करून मृत माझा चितडला सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये नेण्यात आले . चितडाचे शवविच्छेदन करून सावरगाव येथील रोपवाटिकेमध्ये चितडाच्या मृतदेहाला जाळण्यात आले.
         यावेळेस काजळसर बिट चे वनरक्षक के. जी. पाटील, स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर , सदस्य जिवेस सयाम, विकास लोणबले , महेश बोरकर हे उपस्थित होते तर, तळोधी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरुप कन्नामवार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास तळोधी वनविभाग करीत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]