नेरीला बिनधास्त व भारदस्त चोरी

घराचे कुलूप तोडून नेले ४० हजार रुपये

पोलीस येऊन गेले,तक्रार केल्यानंतर चौकशी करणार?

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - एका गरिबांच्या घरी १०० रुपयांची चोरी होणे म्हणजे त्यांच्या संसाराचा दैनंदिन कारभार गडबडणे होय.चोरांना जनाची व मनाची लाज राहात नाही,ते कुठेही हात मारुन निघून जातात.
        असाच चोरीचा प्रकार नेरी येथील वार्ड क्रमांक ३ महात्मा फुले नगर मध्ये घडला असून आज पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान बिनधास्त चोरीची घटना घडली.
          श्रिमती ललिता देवानंद कऱ्हाडे यांच्याकडे छोटेसे किराणा दुकान असून किराणा माल ठेवणाऱ्या रुमचे कुलूप तोडून चोर अंदर घुसला व त्या रुममधील ४० हजार रुपयावर डल्ला मारला.
       याच बरोबर सदर चोरांनी स्वयंपाक रुमची खिडकी तोडून बैठक हाॅल मध्ये शिरला व माल विक्रिचे चिल्लर रुपये नेण्याच्या प्रयत्नात असताना चोराच्या हाताने डब्बा खाली पडला.
         यामुळे हाॅल मध्ये झोपून असलेल्या श्रिमती ललिता देवानंद कऱ्हाडे यांना जाग आलाय व त्यांनी मुलगा अमीत असेल म्हणून आवाज दिला.
          मुलगा अमीतला आवाज देताच सदर चोरांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार खोलून कळायच्या आतच पोबारा केलाय.यामुळे नेमका चोर कोण होता हे निदर्शनास आले नाही.
         किराणा दुकानचे स्वेटर लावण्यासाठी कालच त्यांनी महिला बचत गटांकडून रुपये घेतले होते.
           मात्र सदर चोर हा तरबेज चोरी करण्यात तरबेज असल्याचे लक्षात येते.
         चिमूर पोलिसांनी वेळ न गमावता चोरी प्रकरणी चौकशीला सुरुवात केली तर चोर हा जाळ्यात लटकू शकतो असे चोरीच्या घटना कारणावरुन अंदाज दिसतो आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]