श्री.वासुदेवराव चांगरे साहेब यांच्या जयंती उपलक्षी कामगार रोजगार सभे चे आयोजनअखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस(७२६२) स्वतंत्र कामगार संघटन शाखा चंद्रपुर द्वारे दि.१७/०३/२०२४ रोजी,स्व.श्री.वासुदेवराव चांगरे साहेब यांच्या जयंती उपलक्षी कामगार रोजगार सभे चे आयोजन करण्यात आले
.यावेळी सभेचे अध्यक्ष पदी संघटनेचे प्रदेश सचिव श्री.अक्षय वाल्मीक यांना भुषविण्याचे सौभाग्य प्राप्त झाले.
यावेळी (प्रदेश उपाध्यक्ष) श्री.विजय मोगरे, (प्रदेश सचिव) श्री.सतिश असरेट (प्रदेशसचिव) अक्षय वाल्मीकि (जिलाअध्यक्ष), सुनिल महातव (जिल्हाकार्यध्यक्ष) श्री.अरविंद बक्सरिया, (वरिष्ठ समाज सेवक) श्री.त्रिलोक बीरीया व (जिल्हा संघटक) श्री.सुनिल राठोड साहिल मालिक , सागर महातव हे होते. अरविंद बाक्सरिया यांनी उपस्थित कामगारांना सबोंधित करुन संघटनेच्या कामाची विस्तृत माहीती दिली.
यावेळी प्रामुख्याने दि.०७/०२/२०२४ रोजी मा.श्री.डॉ.पी.पी.वावा, सदस्य,राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग भारत सरकार यांच्या बैठकीच्या ईतीवृत्त प्रमाणे व तसेच चंद्रपुर जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशा प्रमाणे चंद्रपुर जिल्ह्यात सफाईकामगार कंत्राट मध्ये मेहतर, भंगी, वाल्मीकी, डुमार,डोम व ईतर समकक्ष जातितील बेरोजगार युवा युवतींना प्राधान्याने कंत्राट मध्ये नियुक्ती देण्याचे ठराव घेतले आहे.
तसेच रेजा कुली कामगारांना न्याय मिळवुन देण्याकरिता संघटने मार्फत सतत पाठपुरवा सुरु असल्याची माहीती दिली. व उपस्थित युवक युवतियों यानी शैक्षणिक पात्रता/अर्ज संघटना कड़े जमा केले. संघटने कडून त्यांना रोजगार करिता नेहमी प्रयत्नशील असेल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]