अवैद्य रेती तस्करी करणाऱ्या येवती वेना नदीच्या घाटावर पोलीस उपविभागीय अधिकारी यांची कारवाई...।
वरोरा.... जगदीश पेंदाम

अवैध रेती तस्करी करणाऱ्या वाहनावर दि.०.२/०३/२०२४ रोजी पहाटे पाच वाजता दरम्यान, तालुका वरोरा, ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर काही इसम हायवा, ट्रॅक्टर व जे.सी.बी.च्या साहयाने अवैद्यरीत्या रेती उत्खनन करत असल्याचे माहितीचा आधारे नयोमी साटम सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांनी मुकम्मा सुदर्शन सा, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर,रिना जनबंधु अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली ग्रे. पोउपनि विलास बल्की, पोहवा धनराज गेडाम, पोलीस अंमलदार विठठ्ल काकडे,प भाउराव हेपट, रमेश कार्लेवाड, महेश गावतुरे, यांचेसह ग्राम येवती येथील वेणा नदिच्या, मारोती देवघाटवर जाउन कारवाई केली असता, १) विशाल मारोती बदकल, रा. मांढेळी, २) गजानन विठठ्ल येडमे, रा.वंदली ३) भोला आत्राम, रा.बोरी ४) लंकेश चंपतराव बदकल, रा.येवती ५) ओमप्रकाश साहु ६) विकासकुमार, ७) गज्जु मांगरूडकर रा. नागरी हे येवती येथील वेणा नदिच्या, मारोतीदेव घाटतुन, अवैद्यरीत्या रेती उत्खनन करून, जे.सी.बी.च्या साहयाने, दोन हायवा व एक ट्रॅक्टर मध्ये, भरत असतांना मिळुन आले. वरून घटनास्थळावरून ०२ हायवा, १ ट्रॅक्टर, जे.सी.बी.,०५ मोबाईल, व ८, ब्रास रेती असा एकुण १,०६,१५,००० रू.चा मुदद्देमाल जप्त केला. आरोपी विरूध्द कलम-३७९,३४ भादवि, सहकलम-४८ महाराष्ट्र महसुल अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे पो.स्टे. वरोरा हे करत आहेत...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]