गरिबांच्या चुलीवरची भाकर श्रीमंतांच्या गॅसवर, ग्रामीण भागात मागणी.. ज्वारीची पेरणी झाली कमी...

गरिबांच्या चुलीवरची भाकर श्रीमंतांच्या गॅसवर, ग्रामीण भागात मागणी..

ज्वारीची पेरणी झाली कमी...


वरोरा.... जगदीश पेंदाम

शेतकऱ्यांनी ज्वारीपासून तयार केलेले भाकर,झुप  शेतात काम करताना ताकद देत असते त्यामुळे पूर्वी ज्वारीचं पीके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत असायचे, ज्वारीची, बाजरीची भाकर चुलीवर बनवून खरबूज चवीदार असायची त्यावेळी शेतकरी महिला चुलीवर तीन दगड ठेवून, मातीपासून चूल बनवून, त्यावर तवा ठेवून कौपऱ्यात ज्वारीचे पीठ घेत चवीदार गरम भाकर बनवायचे, परंतु आजच्या काळामध्ये ही जागा पोळी, चपाती ने घेऊन पेक्षा भाकर महागडी झालेले आहे..

भाकरीचे आयुर्वेदिक महत्त्व वाढली असून बाजारात किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे कष्टाची भाकर महाग झालेली आहे, हॉटेलमध्ये सुद्धा भाकरीची किंमत चपाती पेक्षा जास्त असून दिवसेदिवस ज्वारीचा घटलेला पेरा व आयुर्वेदात असलेले ज्वारीचे महत्व त्यामुळे अनेक जण ज्वारी
पासुन बनवल्या भाकरीचा लाभ मोठ्या हॉटेलमध्ये घेताना दिसत असतात,एकीकडे धकाधकीच्या काळात तसेच तणावाच्या जीवनात आहारात अधिक महत्व दिले जात आहे शरीरावर विपरीत परिणाम पडू नये यासाठी आरोग्याचे जपन करत आरोग्य पूरक अन्नाला शहरात नागरिक सेवन करत असतात, पोटाचे विकार पचनक्रीया बदलण्याकरता जेवानात ज्वारीची, बाजरीची भाकर अनेकांचा जेवणात आढळून येत आहे..
 शेतकऱ्यांना दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, इतर विविध कारणामुळे ग्रामीण भागात ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने चुलीवर चपाती,पोळी दिसून येत आहे अनेक वर्षापासून जवारीच्या उत्पादनात घट झाली असून यावर्षी वन्य प्राण्यांमुळे, पावसामुळे, गारपिटीमुळे ज्वारी पिकांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे पुढील काळात गरिबांची भाकर आणखी महाग होवून श्रीमंताचा चुलीवरच दिसून येनार आहे.विदर्भात ज्वारी पिकामध्ये मालदांडी ,शाळु, दादर,वाणी, पंढरपुरी, लाही, महत्त्वाचे बिजे गावरान उत्पादन असून अनेक संकरित बिजे ज्वारीचे आहे,  एकीकडे ज्वारीचे भरपूर फायदे असून ज्वारीमध्ये कार्बोहाइडचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळत असते तसेच ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो औसिडस मधून अधिक प्रोटीन मिळत असते तर फायबर्स असल्याने पचन लवकर होते, बुद्धकोष्टीचा असणाऱ्या व्यक्तींनी भाकरीचे सेवन केल्यास त्रास कमी होवून मुळव्याध होत नाही, किडनी स्टोन नागरिकांनी त्रास कमी होते ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे स्टोनचे खडे दूर ठेवत मदत होते, तसेच ज्वारीमध्ये असणाऱ्या  निएँसिनमूळे रक्तातील कॅलेटाँलची पातळी कमी होते, ज्वारीतील पोटॅशियम, मॅग्नेशियम व मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते भाकरीमध्ये लोह चे प्रमाण अधिक असल्यामुळे लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते, तशीच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूफ पिल्यास उष्णतेपासून आराम मिळतो बाजारामध्ये ज्वारीची,बाजरी किंमत 50 ते 55 रुपये किलो असून गहू 30 ते 32 रुपये किलो याप्रमाणे आहे त्यामुळे उन्हाळ्यात बनवणारे ज्वारीचे पापड,धापोळे ग्रामीण भागातून हद्दपार जात आहे, तसेच झुणका भाकर केंद्रामध्ये ज्वारीची भाकर ,वराडी ठेचा याचा आस्वाद भरपूर प्रमाणात श्रीमंत नागरिक घेताना दिसत आहे.....।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]