चिमूर RTO (कॅम्प) मधिल लायसन्स कोट्यात वाढ

१५४ ऎवजी २०३ च्या कोट्यास दिली मंजुरी

चिमूर वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे दर महिन्याला लायसन्स करीता शिबिर घेण्यात येते या शिबीरचा कोटा १५४ इतका होता. परंतु यामुळे चिमूर तालुक्यातील वाहन धारक व बेरोजगार युवक युवती यांना लायसन्स काढून स्वतःचे रोजगार तयार करण्यास मदत होते. चिमूर तालुका हा ग्रामिण क्षेत्रात मोडत असल्याने चंद्रपूर जिल्ह‌यातील आदिवासी बहुल आणि जिल्यातील सर्वात मोठा तालुका आहे. चिमूर वरून जिल्हयाचे ठिकाण हे ११० कि.मी. अंतरावर असल्यामुळे चंद्रपूर येथे जाऊन पूर्ण दिवस व पैसा आणि जनतेचा वेळ खर्च होतो व रोजगार बुडतो. हि बाब लक्षात घेता चालक मालक संघटना प्रतिनिधी बबलु कुरेशी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर किरण मोरे यांना चिमुर येथील लायसन्स शिबिराचा कोटा वाढविण्याबाबद विनंती केली आणि किरण मोरे यांली बेरोजगार युवक व वाहनधारक यांच्या समस्या लक्षात घेता, चिमूर कॅम्पचा लायसन्स कोटा १५४ ऎवजी वाढवून २०३ असा केला प्रादेशिक परिवाहन अधिकारी किरण मोरे यांचे चिमूर तालुक्यातील  जनतेने तसेच चिमूर क्रांती चालक मालक संघटना अध्यक्ष बबलू कुरेशी यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]