कोण होते चांदाचे पहिले खासदार?

Mulla Abdullabhai Taheraliलोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या फेरीतील प्रचार यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  १९ एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून नवा खासदार निवडल्या जाणार आहे. नव्या लोकसभा इमारतीतील चंद्रपूर जिल्हयातील सागवनी लाकडाच्या दरवाज्यातून खासदार म्हणून कोण प्रवेश करेल? याची उत्सुकता लागली आहे.  MP Chandrapur

भाजपाचे दिग्गज नेते, पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार #Sudhir_Mungantiwar यांना भाजपाचे वरिष्ठ वर्तुळानी रिंगणात उतरविले तर, दिवगंत खासदार बाळू धानोरकर यांची पत्नी श्रीमती प्रतिभा धानोरकर #Pratibha_Dhanorkar या अखरेच्या क्षणापर्यंत तिकिटासाठी संघर्ष करून, 'कॉंग्रेसची तिकिट' मिळविण्यांच्या संघर्षात विजय प्राप्त केला आहे.  दोनही बाजूने दावे—प्रतिदावे सुरू आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या गदारोळात आपल्या जिल्हयाचा पहिला खासदार कोण? याची आपण माहिती घेणार आहोत. अलिकडे निवडूण आलेले खासदारांचा आपल्याला परिचय आहे, मात्र आताच्या चंद्रपूर आणि पूर्वीच्या चांदाचा खासदार कोण? हे जाणून घेण्यांची अनेकांची उत्सुकता आहे. First Lok Sabha

१९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर, देशात पहिली लोकसभा १९५१ च्या निवडणूकीने अस्तित्वात आली. १९५१  या वर्षी चंद्रपूर जिल्हा हा चांदा जिल्हा म्हणून ओळखल्या जायचा. चांदा जिल्हा हा मध्यप्रांत वर्हाडचा भाग होता?  महाराष्ट्र राज्याची निर्मीती तेव्हा झाली नव्हती. त्यामुळे चांदा जिल्हयाचा खासदार हा मध्यप्रदेशाचा खासदार म्हणून दिल्लीच्या पहील्या लोकसभेत प्रतिनिधीत्व करीत होते.

कोण होते आपले पहिले खासदार?

मुल्ला अब्दुल्लाभाई ताहेरअली हे आपल्या पहिल्या खासदाराचे नांव आहे. मुल्ला अब्दुल्लाभाई ताहेरअली हे १९ चांदा लोकसभा ​या मतदार संघाचे खासदार होते? ते भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेस या पक्षाकडून निवडणूक लढले आणि 61.77%  टक्के मतदान घेत प्रतिस्पर्ध्यावर मात करीत विजयी झाले होते.

मुल्ला अब्दुलभाई ताहेरअली यांनी एस.पी. पक्षाचे गोविंदराव निळकंठराव हस्तक यांचा पराभव केला होता.  गोविंदराव हस्तक यांना 23.94 टक्के मतदान झाले होते.   याच निवडणूकीत रणशहा बापू गंगशहा बापू सयाम यांनीही आर.आर.पी. या पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यांना 14.29 टक्के मतदान मिळाले.

चांदा लोकसभा निवडणूकीत उभे असलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

1. मुल्ला अब्दुल्लाभाई ताहेरअली - भारतीय राष्ट्रिय कॉंग्रेस 1,42,277 (61.77%)

2. गोविंदराव निळकंठराव हस्तक -  एस. पी. 42,472 (23.94%)

3.  रणशहा बापू गंगशहा बापू सयाम -  आर.आर.पी. 32911 (14.29%)

कोण होते मुल्ला ताहेरअली?

मुल्ला ताहेरअली यांचा जन्म ९ डिसेंबर १९११ रोजी झाला. ते २० वर्षाचे असतांना सुगराबाई यांचेसोबत २० एप्रिल १९३८ ला विवाहबध्द झालेत.  ते चांदा लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून खासदार म्हणून निवडूण गेले होते. त्यांचे शिक्षण नागपूर येथे अंजूमन हायस्कूल येथे झाले. ते यशस्वी व्यावसायीक होते. १९४६ ते १९५१ या काळात ते प्रांतिय अंसेब्लीच्या निवडणूकीत विजयी होत आमदार म्हणून काम केले. १९५२ मध्ये नागपूर नगर कॉंग्रेस कमेटीचे ते उपाध्यक्ष होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]