सिन्देवाही बस स्थानकावरील जल शुध्दिकरन ठरले पांढरा हत्ती

सिन्देवाही बस स्थानकावरील जल शुध्दिकरन ठरले  पांढरा हत्ती


जलशुध्दिकरण सयंत्र कुलूप बंद अवस्थेत
लोक प्रतिनिधी झोपेत,गंभिर समस्येकडे लक्ष देतील काय?
प्रवाशांना प्यावे लागते विहीरीचे अशुद्ध पाणी 
शशिकांत बतकमवार
उन्हाच्यी तिव्रता वाढली आहे,जिवाची लाही,लाही  करणारा उकाळा सुरू आहे,प्रवाशांच्या अंगातूण घामाच्या धारा वाहत आहेत, घश्याला कोरड पडली आहे, परंतु प्रशासनाला पाझरही फुटला नाही.  सिंदेवाही बस स्थानकामध्ये 2020 ला जलशुध्दीकरण संयत्र बसविण्यात आले मात्र हा जलशुद्धीकरण संयत्र कुलुप बंदच आहे, ईथे पिण्याच्या शुध्द पाण्याचा उगमच झाला नाही कुणाच्या दबावामुळे वा आर्थिकीकरणामुळे जलशुध्दीकरण संयत्र बंद?*

जलशुध्दीकरण यंत्रालाही भ्रष्टाचाराले लागले ग्रहण ?

*2019-2020 मधिल जलशुध्दीकरण संयत्र ठरले आहे शो पिस*

*फलकावर या संयत्रा करीता किती खर्च झाला ,कंत्राटदार कोन याचा सादा उल्लेखही नाही त्या मुळे याचे पाणि मुरले आहे अशि शक्यता बढावली आहे.*

सिन्देवाही:-शशिकांत बतकमवार

सिन्देवाही हे तालुक्याचे शहर असलेले ठिकान या ठिकानाहून प्रवास करण्या करीता भव्य बस स्थानक शहराच्या मोक्याच्या ठिकानी आहे.या बस स्थानका वरून रोज हजारो प्रवासी आवागमन करतात,एस.टी.च्या अनेक फेर्या होतात,शेकडो ग्रामीण भागातील विद्यार्थि ईथल्या विघ्यालयात,महाविद्यालयात शिकण्या करीता येतात या सर्व प्रवाशांची, विद्यार्थ्याची ईथे बस स्थानकात आल्या नतंर तृष्णा भागावि म्हणुन जिल्हा परिषद चंन्द्रपूर जिल्हा खनिज विकास निधि अंतर्गत जल शुध्दिकरण संयत्र सन 2019-2020 मध्ये बसविले आहे.  मात्र ते पांढरा हत्ती ठरला असून आज पर्यंत सुरुच झाला नाही.
त्या  लावलेल्या फलकावर या करीता किती निधि खर्च झाला याचाही उल्लेख केला गेला नाही, कंत्राटदाराचे ही नाव नाही .मात्र या योजनेवर लाखो रूपये खर्च करण्यात आल्याची चर्चा आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन उन्हाळ्याची सुट्टी व लग्नसराईचा काळ सुरू असल्यामुळे बस स्थानकवर प्रवाशांची गर्दी होत आहे.

*जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत बसविण्यात आलेले हे जलशुध्दीकरण संयत्र प्रवाशांना शुध्द व शितल जल पाजण्या करीता बसविण्यात आले की त्या नावे मलाई खाण्या करीता बसविण्यात आले आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. बस स्थानक नियत्रंकाला या बाबत विचारले असता मला माहीत नसल्याचे उत्तर मिळत आहे.*
जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत बसविण्यात आलेले हे जल शुध्दीकरण संयत्र लाखो रूपये खर्च करून प्रवाशांना व एस.टी.च्या चालक, वाहकांना शुध्द पानी मिळावे म्हणून या संयत्राची व्यवस्था करण्यात आली असेल तर नेमके पाणी कुठे मुरले?परिणामी प्रवाशांना एस.टी.च्या चालक,वाहकाला स्थानिक दूकानातून नगदी पैशे मोजून बाटली बंद पानी घेऊन प्यावे लागत असल्याने खिशाला कात्री लागत आहे.सोबतच या बस स्थानकावर रोज रात्रो एस.टी.चे कर्मचारी मुक्कामी असतात त्यांना ही रात्रो पाण्याची आवश्यकता भासते.त्यामुळे शासनाचे लाखो रूपये नीरर्थक वाया गेलेले आहे.व ग्रामीण भागातील प्रवाशांना शुध्द पाण्या अभावी विविध आजारांना तोंड द्यावे लागणार आहे.
नागरीकांच्या सुद्रृढ आरोग्यासाठी पर्यावरणासोबतच पिण्याचे शुध्द पाणी ही महत्वाचे आहे.पिण्यासाठी शुध्द पाणी न मिळाल्यास नागरीकाना, हाळाच्या विविध आजारा सोबतच न्युराँलॉजिकल, मधुमेह,रक्तदाब,आणी ह्रृदयरोगा सह,अनेक आजार होण्याची शक्यता असते.या आजारा पासून आर्थिकद्रृष्ठ्या संपन्न प्रवाशी  हे 20 रू दराचे बाटली बंद पाणी विकत घेउन पितात,मात्र गरीब वर्गाला व रोज विघ्यालय,महाविद्यालयात शिक्षन घेण्याकरीता येणार्या विध्यार्थ्यांना हे पाणी विकत घेउन न परवडनारे आहे.त्या मुळे ह्या  जलशुध्दीकरणाचे जल कुठे मुरले?व ते का सुरू करण्यात आले नाही याची संमधीत विभागाने चौकशी करून हे संयत्र लवकर सुरू करून प्रवाश्याणा दोण घुट शुध्द पाण्याचे मिळावे ऐवढीच अपेक्षा....प्रवाशी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]