नळाची पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाहते मुख्य रस्त्यावर... शेगाव ग्रामपंचायत दुर्लक्ष...

नळाची पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाहते मुख्य रस्त्यावर...

शेगाव ग्रामपंचायत दुर्लक्ष...

वरोरा...जगदीश पेंदाम

उन्हाळा म्हटला कि पाणी टंचाई ची समस्या सगळीकडे सुरू होते वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) या गावासाठी ही समस्या काही नवीन नाही मग तो उन्हाळा असो कि पावसाळा १२ ही महिने पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला भटकंती करावीच लागते, शेगाव ही तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून गावची लोकसंख्या दहा हजारवर आहे त्यामुळे हजार लिटर पाणी नेहमी गावकऱ्यांना प्रत्येक दिवसाला  लागत असते उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पिण्यासहित गावकऱ्यांना कुरल मध्ये पाण्याची आवश्यकता पडत असते परंतु नळाला पाणी पिण्यासाठी येत नसेल तर गावकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न शेगाव वाशीय जनतेला पडलेले आहे..

मागील तीन महिन्यापासून पाईपलाईनचे काम सुरू असून वारंवार ग्रामपंचायत जनतेला खोटे आश्वासनावर जगवत आहे उन्हाळ्या दिवसांमध्ये जनतेला पिण्याचे पाणी मिळत नसून गावात असलेल्या व्यवसायिक अँरोच्या कँण पाण्याच्या  माध्यमातून जनतेला विकत घेऊन आर्थिक उदंड भरून पाणी प्यावे लागत आहे गावातील नळाची पाईपलाईन फुटल्याने मुख्य रस्त्यावर सांडपाणी ग्रामपंचायत हलगर्जीच्या रूपात वाहताना दिसत आहे..  
एकीकडे पावसाळ्यात २-३ दिवसा नंतर नळाला पाणी येते तर उन्हाळ्यात सात दिवसानंतर  पाण्यासाठी नळाची वाट पहावी लागते त्यातही एवढे दिवस वाट बघितल्या नंतर नळाला फिल्टरचे स्वच्छ पाणी मिळतच नाही
पण सध्या मागील १५-२० दिवसा पासून वरोरा-चिमूर मुख्य महामार्गवर नळाची पाईपलाईन फुटलेली असून ग्रामपंचायतला मात्र दूरस्ती करण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र आढळून येत आहे...
एकीकडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात पाणी टंचाई व दुसरीकडे मात्र हजारो लिटर पाणी वाया जात असलेल्या ग्रामपंचायतकडे शासन लक्ष देणार का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहे, हजारो लिटर पाणी वाया गेलं असून दरवर्षी शासनाकडून हजारो रुपये निधी येत असतो, तो खर्चही केल्या जातो परंतु शेगाव ग्रामपंचायचे दुर्लक्ष आहे उन्हाळ्यात तरी जनतेला पिण्याचे पाणी मिळेल का याकडे जनता आशने बघत आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]