विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, चारगांव चक येथील घटना.

 विहिरीत उडी घेऊन आत्महत्या,
चारगांव चक येथील घटना.
यश कायरकर.(तालुका प्रतिनिधी):
             तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राहणार चारगाव (चक) येथील नीलकंठ गोपाळा ठाकरे वय 48 याने गावाजवळील शेत शिवारातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली.
             वडील रात्री घरी परत न आल्याने सकाळी मुलाने तपास केले असता गावाशेजारी एका विहिरीजवळ दुपट्टा व वडीलाचे जोडे दिसल्याने विहिरीचा अंदाज घेतला असता त्यात त्यांची मृतदेह आढळला . तात्काळ घटनेची माहिती तळोधी पोलिसात मुलाद्वारे दिली असता मर्ग दाखल करून , शव विहीरीच्या बाहेर काढून शवविच्छेदन करता नागभीड ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.      
                  घटनास्थळी तळोधीचे ठाणेदार अजित सिंग देवरे व पी.एस.आय. लांबट यांच्या मार्गदर्शनात समोरील तपास ए.एस.आय. ऊराडे हे करीत आहेत.    मिळालेल्या माहितीमुळे नुसार मृतकला दारूचे खूप व्यसन असल्याने त्यानेही आत्महत्या केल्याची नातेवाईकाकडून समजले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]