प्रशिक्षणार्थ्यांनी कौशल्ययुक्त व्यवसाय प्रशिक्षण घेऊन उत्तम उद्योजक व्हावे - प्रधान सचिव मनिषा वर्माप्रशिक्षणार्थ्यांनी  कौशल्ययुक्त व्यवसाय प्रशिक्षण घेऊन उत्तम उद्योजक व्हावे - प्रधान सचिव मनिषा वर्मा


 गडचिरोली (प्रतिनिधी)-     
निवडलेल्या व्यवसायांमध्ये  कौशल्ययुक्त प्रशिक्षण प्राप्त करून प्रशिक्षणार्थ्यांनी  भविष्यात उत्तम उद्योजक बनावे. स्वयंरोजगारातून स्वावलंबन हे सूत्र मनी रूजवावे , असा मोलाचा संदेश प्रशिक्षणार्थ्यांशी  संवाद साधत कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता विभागाच्या प्रधान  सचिव श्रीमती मनिषा वर्मा यांनी दिला.
       शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे आज सकाळी  प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा  यांनी सदिच्छा भेट दिली.त्यावेळी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी त्यांचे  पुष्पगुच्छांने स्वागत केले. श्रीमती मनिषा वर्मा यांनी संपूर्ण संस्था परिसर आणि कार्यशाळेचे निरीक्षण केले. कार्यशाळेत प्रात्यक्षिक करणा-या  प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला आणि  प्रशिक्षणासंदर्भात येणाऱ्या  अडीअडचणी विशेषत्वाने जाणून घेतल्यात .‌  त्यांनी याप्रसंगी काही मार्गदर्शनपर महत्त्वाच्या सूचना उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना  केल्यात.‌ तसेच आदर्श संस्था निर्मितीच्या दृष्टीने आमूलाग्र बदलासाठी  सूचना केल्यात.याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके आणि सर्व कर्मचारी ‌वर्ग उपस्थित होता. प्रधान सचिवांच्या प्रत्यक्ष भेटीने संस्थेतील प्रशिक्षणार्थी वर्गही आनंदून गेला, हे विशेष.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]