धानोरकरांच्या शपथपत्रातील 'हातउसणे'ची मतदार संघात चर्चा
धानोरकरांच्या शपथपत्रातील 'हातउसणे'ची मतदार संघात चर्चा
इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या शपथपत्रात जाहीर केलेले 'हातउसणे' लोकसभा मतदार संघात मतदारांच्या चर्चेचा विषय झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर 'हातउसणे' घेण्यांची कॉंग्रेस उमेदवारांना गरज काय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सुमारे 135 करोड रूपयेच्या वर संपत्ती असल्यांचे प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात कबुली दिली आहे. त्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असून, या शपथपत्राची पिडीएफ मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. शपथपत्रात व्यवसाय आणि शेती असा उल्लेख श्रीमती धानोरकर यांनी केला आहे. आपण शेतकर्याची लेक असल्यांचे त्या भाषणात आवर्जुन सांगतात तर, विरोधक आपल्या भाषणातून त्यांच्या दारू व्यवसायाचा उल्लेख जाणीवपूर्वक करतात.
श्रीमती धानोरकर यांनी आपल्या प्रापर्टीसोबतच, आपल्यावरील दायीत्वाची यादीही दिली असून, त्यात 77 लोकांकडून सुमारे 44 करोड 56 लाख एक हजार चारशे एकोनअंशी रूपये 'हातउसणे' घेतल्यांचे दिसत आहे. सर्वाधिक 6 करोड 46 लाख दहा हजार रूपये हातउसणे घेतले आहे तर, 10 लाख रूपयाची हातउसणे सर्वात कमी रक्कम आहे.
हातउसणे देणाराची नांवे बघितल्यास, बहुतांश कोळसा व्यापारी, उद्योजक, कंत्राटदार, रेती कंत्राटदार आणि जमिनीचा व्यवसाय करणारे असल्यांचे दिसून येते. एवढ्या मोठ्या रक्कमाचे हातउसणे, श्रीमती धानोरकर यांनी शपथपत्रात दाखविल्यांने, हातउसणे देणारे अडचणीत येण्याची शक्यताही आहे. यातील अनेकजन सत्तारूढ भाजपाशी संबधीतही आहेत. ही रक्कम जाहीर झाल्यांने, आयकर विभागाचा ससेमिरा तर आपल्यामागे लागणार नाही ना अशी भीती श्रीमती धानोरकर यांना हातउसणे देणार्यांना लागत आहे.
हातउसणे देणारे आणि त्यानी दिलेली रक्कम (शपथपत्राप्रमाणे)
1. अनिल नारायण धानोरकर 10,00,000.00
2. तनिश्का ट्रेडर्स 70,00,000.00
3. सत्यनारायण सारडा 20,00,000.00
4. भावना मनिष पटेल 10,00,000.00
5. रामदास भिसडे 25,00,000.00
6. दामोधर सारडा 1,50,00,000.00
7. दीप ट्रान्सपोर्ट 61,85,000.00
8. दिनेश बंग 10,00.000.00
9. श्रीनिवास कन्हैयालाल बजाज
17,00,000.00
10. गजानन किराणा स्टोअर्स
80,00,000.00
11. गौरव शिव सारडा 30,00,000.00
12. गौरीशंकर ट्रेडिंग कंपनी 36,00,000.00
13. गौरीश अॅग्रो प्राय. लिमी.
4,23,00000.00
14. जय गिरनारी कन्स्ट्रक्शन
1,57,90000.00
15. किशोर फुलझेले 15,00,000.00
16. लक्ष्मण नानाजी भोयर
85,00,000.00
17. लिलादेवी दिनेश तोष्णीवाल
15,00,000.00
18. महेश बजाज 35,00,000.00
19. ममता संजय आलेवार 40,00,000.00
20. वैभव लालेंद्र लांजेवार
10,00,000.00
21. मोरेश्वर पटवा 20,00,000.00
22. नारायण आत्माराम धानोरकर
31,00,000.00
23. पी. एस. एम. कन्स्ट्रक्शन
5,50,20000.00
24. पी. एच. एम. मेटल इंडस्ट्रिज
38,47,000.00
25. नत्थू आत्माराम धानोरकर
10,00,000.00
26. प्रविण काकडे 29,83,000.00
27. राजकुमार इश्वरदास नाथनी
35,00,000.00
28. शिवनारायण सारडा 20,00,000.00
29. श्री. गणेश मार्केटींग
3,03,469.00
30. श्रीकांता नरेशकुमार बंग
15,00,000.00
31. शामसुंदर काबरा 61,00,000.00
32. सितादेवी शंकरलाल बंग
10,00,000.00
33. सुभाष ट्रेडर्स 25,00,000.00
34. सुनैना राजेश काकानी
20,00,000.00
35. सुरेश मारोतराव काकडे
1,01,38000.00
36. सुरेश नरसिंगदास सारडा
20,00,000.00
37. सुरेश नारायण धानोरकर
75,25,010.00
38. सुषमा शिवनारायण सारडा
50,00,000.00
39. सारडा यार्न एजन्सी
38,00,000.00
40. उर्मीला सत्यनारायण सारडा
20,00,000.00
41. विराट ट्रेडिंग कंपनी
1,10,00000.00
42. विवेक रमेशराव आकोजवार
80,00,000.00
43. अजय मानिकलाल गुप्ता
21,00,000.00
44. अंबीका रियल्टी 55,00,000.00
45. अमृत टेक्सटाईल्स 40,00,000.00
46. अनुसया ब्रिजमोहन पंपालीया
15,00,000.00
47. वसंत सुर्यनाथसिंह
6,46,10,000.00
48. बशिर एंटरप्राईज 59,00,000.00
49. मनोरमादेवी गिरीधरगोपाल भुतडा
10,00,000.00
50. चौधरी दिनेश गोवर्धन
10,00,000.00
51. दीपक शिवदास पटेल 15,00,000.00
52. देवेंद्र किशनगोपाल सवाना
10,00,000.00
53. दुर्गादेवी दामोधर सारडा
25,00,000.00
54. गिरीराज ब्रिजरतन कोठारी
15,00,000.00
55. गोपीचंद हिरालाल केशरवानी
10,00,000.00
56. सतिश देवीदास खासबसे
10,00,000.00
57. महेंद्र वासुदेव बावनकर
25,00,000.00
58. कन्हैया मेहाडीया 10,00,000.00
59. नोयल कन्हैयालाल मेहाडीया
25,00,000.00
60. नानेश्वर सखाराम पिंपळशेंडे
53,00,000.00
61. एन. डी. इलेक्ट्रीकल्स
1,45,00000.00
62. निकुंज हसानी 2,05,00000.00
63. पारेख त्रिभुवनदास अॅंड सन्स
15,00,000.00
64. लालजी पंजाभाई पटेल
10,00,000.00
65. पायल प्रविण सारडा 45,00,000.00
66. प्रकाश बाबुराव वैरागडे
35,00,000.00
67. प्रमोद मगरे 1,53,00000.00
68. राजकुमार रामप्रसाद जाजू
35,00,000.00
69. रामगोपाल बजाज 10,00,000.00
70. संजय प्रेमचंद सुजन
10,00,000.00
71. सरस्वती ट्रेडलिंक
10,00,000.00
72. नरसिंगदास व्यकंटलाल सारडा
10,00,000.00
73. शिल्पा जाजू 10,00,000.00
74. श्री कलेक्शन 20,00,000.00
75. श्री. शाम एंटरप्राईजेस
10,00,000.00
76. श्रीकांत रामानंदजी बजाज
15,00,000.00
77. दिपाश व्यकंट मुदलीयार 10,00,000.00
बापरे !
उत्तर द्याहटवा