साथीच्या आजाराच्या दिवसात औषधीचा तुटवडा... जिल्हा प्रशासनाने औषधी उपलब्ध करण्याची जनतेची मागणी...वरोरा...जगदीश पेंदाम 

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून औषधांच्या कमतरतेमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे...
 
ग्रामीण भागातील जनतेला उपचार करीता सावरी प्राथमिक आरोग्य केंद्र असून यांच्या अंतर्गत 48 गावे येत असतात सगळीकडे शेतीच्या हंगाम सुरू असून पैशा अभावी ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजूर, शालेय विद्यार्थी, गरोदर माता, इतर नागरिक उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपयोग करत असतात ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात डोळ्याचे आजार, हगवण, उलटी, डायरीयाचे प्रमाण वाढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांना योग्य औषधी व उपचार मिळत नसल्याने नागरिकांना खाजगी महाग उपचार घ्यावे लागत असुन जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण जनतेला त्रास सहन करावा लागत आहे खेड्यापाड्यात या आजाराने जोर पकडलेला असून संसर्गजन्य आजारावर वेळीच आळा घालण्याचा दृष्टीने शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडत नाही ना असा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत असून ग्रामीण परिसरात जनतेच्या भोळ्या पणाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी शिरकाव करून ग्रामीण भागात उपचार करतांना दिसत आहे, तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रामध्ये या संसर्गजन्य आजारावरील औषधीच्या कमतरतेमुळे बाहेरील मेडिकल, खाजगी रुग्णालयकडे सामान्य जनतेला उपचाराकरीता धाव घ्यावे लागत आहे..
सावरी आरोग्य केंद्रात गरोदर माता, शेतकरी,शेतमजूर,विद्यार्थी लहान मुले, महिला ज्येष्ठ नागरिक  यांना विटामिन कॅल्शियमची औषधी, इंजेक्शन आवश्यक आहे मात्र अनेक महिन्यापासून ही औषध उपलब्ध नसून  सगळीकडे सुरू असलेल्या डोळ्यांच्या आजाराचे ड्राफ्ट सुद्धा उपलब्ध नाही, प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओ पी डी मध्ये शंभरच्या वर रुग्ण येत असून रोज पाच ते सहा रुग्ण डायरीया आजाराची मिळत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तुटवडा भासत असलेल्या औषधीच्या पुरवठा तात्काळ करून देण्याची मागणी  परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]