उद्या कोहळी समाज स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन


तळोधी बा प्रतिनिधी/- 
कोहळी समाज बहुउद्देशीय मंडळ तळोधी बालापुरच्या वतीने फरवरी मार्च 2023 च्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार, यशवंत व्यक्तीच्या सत्कार व कोहळी समाज स्नेह मिलन सोहळा लोक विद्यालय सावरगाव येथील  येथील ग्राउंड वर दिनांक 1ऑक्टोबर 2023 ला आयोजित करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती व अध्यक्ष पद्मश्री डॉ. परशुराम पुणे गुरनोली, सत्कारमूर्ती दिवाकर  निकुरे युवा सामाजिक कार्यकर्ता मंगरूळ, प्राध्यापक नलिनी बोरकर कमला नेहरू महाविद्यालय नागपूर, प्राध्यापक उत्तम मुंडे भगवंतराव कनिष्ठ महाविद्यालय अहेरी, धनंजय बनसोड संचालक कल्पतरू विद्या मंदिर शिंदेवाही, रवींद्र पाटील सरपंच ग्रामपंचायत सावरगाव इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष सुखदेव भाकरे, उपाध्यक्ष रमेश बोरकर ,सचिव प्रभू मस्के, कोषाध्यक्ष महेश काशिवार, सहसचिव प्रमोद गायकवाड व सदस्य यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]